Monday, May 6, 2024
HomeआंबेगावGhodegaon: घोडेगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

Ghodegaon: घोडेगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

Ghodegaon: आदिम संस्कृती अभ्यास, संशोध व मानव विकास केंद्र, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), अखिल भारतीय किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. (Ghodegaon)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉ. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले. ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांच्या जीवनावर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थितांना प्रा. महेश गाडेकर यांनी ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कि, ‘सद्यस्थितीमध्ये आपण देशातील परिस्थिती लक्षात घेता संविधानाबद्दल युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती करणे गरजेचे आहे, तसेच तरुणांनी आपले भारतीय संविधान समजून घेऊन त्यानुसार या देशाची रचना करण्यासाठी कटिबद्ध असायला हवे.’ यासोबतच भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे यावेळी सामुहिक वाचन करण्यात आले.

यावेळी किसान सभेचे तालुका कार्याध्यक्ष बाळू काठे, एसएफआय चे पुणे जिल्हा कोष्याध्यक्ष बाळकृष्ण गवारी, आदिम संस्थेचे राहुल कारंडे आदी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बाळकृष्ण गवारी, तर आभार राहुल कारंडे यांनी मांडले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय