Monday, May 6, 2024
HomeआंबेगावGhodegaon : एसएफआय च्या आजी - माजी कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा

Ghodegaon : एसएफआय च्या आजी – माजी कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा

घोडेगाव : रविवार दि. ३१ मार्च २०२४ रोजी घोडेगाव येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या आजी माजी कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा एसएफआय चे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. महारुद्र डाके यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. या मेळाव्याला २००० ते २०२४ च्या कार्यकाळातील ५० आजी-माजी कार्यकर्ते उपस्थित होते. Ghodegaon

या स्नेहमेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे, DYFI या युवा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मोटे तसेच DYFI राज्य सचिव दत्ता चव्हाण यांची उपस्थिती होती.

यावेळी एसएफआय चे माजी कार्यकर्ते बाळू वायाळ, राजू घोडे, बाळू काठे, बाबू आंबवणे, विकास भाईक, अशोक जोशी, रोहिदास गभाले  यांनी संघटनेतील जुने अनुभव व आठवणींना उजाळा दिला. त्यांनतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.अमोल वाघमारे यांनी जुन्या आठवणी मांडत सध्याच्या काळात सुरु असलेल्या युवकांना भेडसावणाऱ्या बेरोजगारी, लग्ने न होणे, त्यातून वाढणारे नैराश्य, व्यसनाधीनता त्याचबरोबर धर्मांध शक्तींच्या विचारांना बळी पडून असंविधानिक मार्गाला जाणे इ. समस्यांची मांडणी करत आपल्याला युवा पिढीला यातून बाहेर काढण्यासाठी व संविधानाच्या रक्षणासाठी युवक संघटनेची गरज असल्याचे सांगितले.

तसेच डॉ.ज्ञानेश्वर मोटे यांनी एसएफआय ची भातृभावी संघटना असलेल्या डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या युवा संघटनेच्या आंबेगाव तालुका संघटक समितीच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडूला.  हा प्रस्ताव लोकशाही पद्धतीने एकमताने पारित झाल्यावर १५ जणांच्या संघटक समितीची निवड करण्यात आली. 

डीवायएफआय चे राज्य सचिव दत्ता चव्हाण हे संबोधित करताना म्हणाले, येत्या काळात डीवायएफआय प्रत्येक गावोगावी पोहचवून युवकांच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन करून नवीन समितीला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महारुद्र डाके यांनी एसएफआय व डीवायएफआय या संघटनांची ‘सर्वांना शिक्षण, सर्वांना काम’ हि अत्यंत मुलभूत मागणी असल्याने या संघटनांची समाजाला गरज असून या दोन्ही समविचारी संघटनाना एकमेकांच्या भातृभावाने मजबुत करण्याचे आवाहन करत कार्यक्रमाचा समारोप केला.

या स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक डीवायएफआय च्या संघटक समितीचे नवनिर्वाचित निमंत्रक अविनाश गवारी यांनी, सूत्रसंचालन डीवायएफआय चे कार्यकर्ते महेश गाडेकर व आभार प्रदर्शन एसएफआय आंबेगाव तालुका सचिव योगेश हिले यांनी मांडले. या स्नेहमेळाव्याचे आयोजन एसएफआय चे आंबेगाव तालुका समितीने अध्यक्ष रोहिदास फलके, जिल्हा अध्यक्ष दिपक वालकोळी, जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण गवारी यांच्या नेतृत्वाखाली केले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय