Tuesday, May 21, 2024
Homeराज्यKolhapur : विनापरवाना बंदूक जवळ बाळगणाऱ्याला पोलिसांकडून अटक

Kolhapur : विनापरवाना बंदूक जवळ बाळगणाऱ्याला पोलिसांकडून अटक

Kolhapur / यश रुकडीकर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी राहुल सुतार याला अटक केली आहे. त्याच्याकडून विनापरवाना बंदूक, एक जिवंत काडतुस व नंबरप्लेट नसलेली मोपेड गाडी हस्तगत करण्यात आली आहे. Kolhapur news

येणाऱ्या निवडणुकींच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यामध्ये बेकायदा हत्यार बाळगणाऱ्या इसमांना शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलिसांना दिले आहेत.

या सूचनांप्रमाणे तपास करत असताना पोलीस हवालदार दिपक घोरपडे यांना राहुल सुतार नामक इसम कनेरकर नगर चौक येथे बिना परवाना बंदूक घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. यानंतर पो. नि.रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा.पो.नि सागर वाघ, अंमलदार हिंदुराव केसरे, बालाजी पाटील, ओमकार परब, अमित मर्दाने, तुकाराम राजिगरे या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून राहुल मोहन सुतार (वय 34, रा. राजोपाध्याय नगर, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) यास अटक केली.

त्याच्याकडून बारा बोअरची सिंगल बॅरेल बंदूक,1 जिवंत काडतुस व विना नंबर प्लेटची मोपेड गाडी हस्तगत करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार हिंदुराव केसरे, बालाजी पाटील, ओमकार परब, अमित मर्दाने, तुकाराम राजिगरे या पथकाने केली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय, समाजाला केले ‘हे’ आवाहन

ब्रेकिंग : भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान

मोठी बातमी : गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदचा पैसा वापरला, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

महादेव जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी; “या” मतदारसंघातून लढणार!

उमेदवारी जाहीर होताच डॉ.अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा

मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी बनला बोगस पोलिस, पुढे काय झाले वाचा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

ब्रेकिंग : आंबेडकर कुटूंबातील मोठा चेहरा अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात लढणार

बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित; राजद, कॉंग्रेस, डाव्यांना “इतक्या” जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय