Saturday, December 7, 2024
Homeताज्या बातम्याCPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा

CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा

CPIM Lok Sabha Candidate List : लोकसभेच्या निवडणुकांचे वारे देशभरात वाहत आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा सुरू आहेत. अशातच भारताचा कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी (CPIM) ने 44 उमेदवारांची घोषणा केली आहे. CPIM announces list of 44 candidates

भारताचा कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी (CPIM) ने गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत केरळमधील 15 उमेदवारांचा समावेश आहे. यात अलप्पुझाचे विद्यमान खासदार एएम आरिफ, माजी आरोग्य मंत्री केके शैलजा आणि राज्यसभा खासदार इलामाराम करीम यांचा समावेश आहे.

या यादीमधील पश्चिम बंगालच्या 17 नावांमध्ये मुर्शिदाबादमधील मोहंमद सलीम यांचाही समावेश आहे. या यादीत तामिळनाडूतील 2 उमेदवारांची नावे आहेत. मदुराईचे विद्यमान खासदार एस व्यंकटेशन आणि दिंडीगुलचे आर सच्चिदानंदम यांना तिकीट देण्यात आले आहे.

माकपने बिहार, झारखंड, आसाम, कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे, पंजाब, राजस्थान, तेलंगणा आणि त्रिपुरासाठी प्रत्येकी एक उमेदवार जाहीर केला आहे.

माकप हा ‘इंडिया’ आघाडी सोबत लोकसभा निवडणूक लढवत आहे. मात्र, केरळमध्ये काँग्रेस आणि त्यांच्यात युती नाही. येथे हा पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. याशिवाय झारखंड आणि बिहारमध्ये सीपीआय (एम) देखील महाआघाडीचा एक भाग आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात 9 शेळ्यांचा मृत्यू

ब्रेकिंग : व्हाट्सॲपवर निवडणूकीचा प्रचार करणाऱ्यावर मोठी कारवाई

मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!

मध्यरात्री शेकडो विद्यार्थिनींचे कुलगुरूंच्या बंगल्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध

अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश

मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर

संबंधित लेख

लोकप्रिय