Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याAmol Kolhe: मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!

Amol Kolhe: मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!

Amol Kolhe : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी स्वागत केलंय.

डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी म्हटलं आहे की, धन्यवाद शिंदे साहेब ! आपल्या भावना अतिशय स्तुत्य आहेत. कलाकार हा आपल्या कलेने समाजाला प्रबोधन करणारा, समाजाला आरसा दाखवणारा “माणूस” असतो. परंतू आमच्या भागातील पूर्वी आपल्याच पक्षात असलेले व सध्या आपण दुसऱ्या पक्षाला उसने दिलेले एक गृहस्थ मला सतत “नट” म्हणून हिणवतात.

माझ्या कलेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारत शिवशंभू विचार प्रत्येकाच्या मनात रुजविण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. केवळ आकस म्हणून मला “नट” म्हणून हिनवणे योग्य नाही हे कृपया आपण आपल्या सहकाऱ्यांनाही सांगावे !, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लगावला आहे.

28 मार्च रोजी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते व माजी खासदार गोविंदा आहुजा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. बाळासाहेब भवन येथे पार पडलेल्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून 14 वर्षांनी पुन्हा राजकारणात नवी इनिंग सुरू करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कलाकार हा कलाकार असतो. त्याचा अपमान म्हणजे संपूर्ण सिनेसृष्टीचा अपमान असतो. त्यामुळे कलाकारांना मान दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे म्हणाले, त्याचा व्हिडीओ पोस्ट करत अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. सध्या आपण दुसऱ्या पक्षाला उसने दिलेले एक गृहस्थ मला सतत “नट” म्हणून हिणवतात. पण तुम्ही व्यक्त केलेल्या भावना योग्य असल्याचे अमोल कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश

मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर

तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर घणाघात

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

संबंधित लेख

लोकप्रिय