Sunday, April 28, 2024
Homeताज्या बातम्याPrakash Ambedkar : तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर...

Prakash Ambedkar : तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर घणाघात

Prakash Ambedkar : महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला सोबतची युती तोडली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षात जागावाटपाबाबत चर्चा सुरू होती, मात्र ही चर्चा व्यर्थ गेल्याचे दिसत आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीत सहभागी न होण्याची घोषणा करत 8 उमेदवारांची नावे जाहीर केली.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या युती संदर्भात दोन्ही बाजू सकारात्मक असल्याचे सातत्याने सांगत होते. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांना तुम्ही तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे, अशी घणाघाती टीका केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोशल मीडिया ‘एक्स’ वर लिहले आहे की, संजय राऊत तुम्ही तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती ते आम्हाला माहिती आहे. अकोल्यात आमच्याविरोधात उमेदवार उभा करण्याबाबत तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता हे खरं नाही का? एका बाजूला आघाडी बनवत असल्याचं चित्र निर्माण करताय आणि दुसऱ्या बाजूला आम्हालाच पाडण्याचा कट रचताय, तुम्ही हे कसलं नातं निर्माण करत आहात. तुमचे विचार असे आहेत? असे ही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय