Sunday, April 28, 2024
Homeताज्या बातम्याAkola Vidhan Sabha : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक...

Akola Vidhan Sabha : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

Akola Vidhan Sabha : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करतानाच केंद्रीय निवडणुक आयोगाने त्या त्या लोकसभेतील विधानसभेच्या पोटनिवडणुका घेण्याचेही आदेश दिले होते. महाराष्ट्रातही अकोला पश्चिम विधानसभेची निवडणूक घेण्यात येणार होती. मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) अकोला पश्चिम विधानसभा (Akola West Assembly) पोटनिवडणूक रद्द करण्याचे आदेश दिले आहे.

भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे ४ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाल्याने अकोला पश्चिम विधानसभेची जागा रिक्त झाली होतीय. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून अकोला पश्चिम विधानसभा (Akola Vidhan Sabha) पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. परंतु, आता ही पोटनिवडणूक रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून देण्यात आले आहेत. न्या. अनिल किलोर आणि न्या. जवळकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.

आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने अकोला पश्चिम विधानसभेची जागा रिक्त झाली होती. यासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. केवळ तीन महिन्याच्या कालावधीसाठी ही निवडणूक कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तीन महिन्याच्या कालावधीसाठी जनतेच्या पैशाचा अपव्यय नको यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. अकोल्यातील शिवमकुमार दुबे नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. दरम्यान, यावर निकाल देतांना न्यायालयाने निवडणूकच रद्द करण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान, या निवडणुकीसाठी काँग्रेसने पश्चिम मतदारसंघात साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर केली होती. तर भाजपकडून अद्यापही कोणताही उमेदवार मैदानात नव्हता.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

‘बदला’ घेणे एवढाच उद्देश; डॉ.अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका

वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय