Wednesday, January 22, 2025

Loksabha Elections : …तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक

Loksabha Elections : आम्ही महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar) मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी महायुतीला दिला आहे. Loksabha Elections news

महायुतीत सध्या जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे हे बारामती मतदारसंघावर अडून बसले आहेत. त्यांनी थेट बंडाचा पवित्रा घेतला असून 12 एप्रिलला ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान रविवारी शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली. त्यानंतर अजित पवार गटाकडून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, शिवतारे यांनी आमचे नेते अजित पवार यांच्यावर अश्लाघ्य शब्दात टीका केली आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही मागणी करत आहोत. त्यांची हकालपट्टी करा ही आमची मागणी आहे. जर एकनाथ शिंदे यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला महायुतीतून बाहेर पडावे लागेल. दुसरा काही पर्याय आमच्याकडे उरणार नाही, असे उमेश पाटील म्हणाले. (Loksabha Elections)

विजय शिवतारे ज्या प्रकारे टीका करत सुटले आहे ते सहन करण्याच्या पलिकडे आहे. आता त्यामुळे महायुतीत राहायचे की नाही याचा आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत. आमच्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह टीका आणखी सहन केली जाणार नाही. शिवतारे यांच्या भूमिकेमुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये दुरावा येत आहे, त्यामुळे शिवतारेंची हकालपट्टी करावी, अशी मागणी उमेश पाटील यांनी केली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी अंकिता लोखंडेनं एकही रूपया घेतला नाही; वाचा काय आहे कारण !

महत्वाची बातमी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह ‘हे’ बारा ओळखपत्र ग्राह्य धरणार

अंगाला रंग लावून दोन मुलींचे अश्लिल चाळे, मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल !

शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….

मोठी बातमी : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी जाहीर

अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ शकतो तिकीट !

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, महाविकास आघाडीत खळबळ

Bhutan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी

Related Articles

- Advertisement -

Latest Articles