Friday, May 3, 2024
Homeताज्या बातम्याShivsena : शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….

Shivsena : शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….

Shivsena : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत शिवसेना फोडत भाजप सोबत सत्ता स्थापन केली. आणि एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. निवडणूक आयोगाने देखील शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला. आता लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना मनसे देखील महायुती सोबत येण्याच्या तयारीत आहे. अशात शिवसेना राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) ताब्यात जाऊ शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. Shivsena News

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांची महाराष्ट्रातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या काही मर्यादेच्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडील मतदार खेचण्यासाठी मनसेचं शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरण करुन, शिवसेनेचं नेतृत्वच राज ठाकरे करणार असल्याच्या चर्चा आहेत. Shivsena News

शिवसेना फोडण्यात भाजपाला जरी यश आले असले तरीही ठाकरेंचा पारंपारिक उमेदवार आपल्याकडे वळविण्यात एकनाथ शिंदे यांना तितके यश आलेले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडील मतदार खेचण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडेच शिवसेनेची धुरा सोपविण्याची भाजपाची चाल रचली असल्याचे बोलले जात आहे.

या चर्चांच्या पार्श्वभुमीवर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘शिवसेना राज ठाकरे यांच्याकडे सोपविणार का ?’ असा प्रश्न विचारला असता ‘मी काही राज ठाकरेंचा प्रवक्ता नाही की शिवसेनेचा प्रवक्ता नाही’ असे फडणवीस म्हणाले. तसेच कुणाचा पक्ष कोणाकडे जात नसतो, असे म्हणत हे खरं आहे. महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या येण्याची चर्चा सुरु आहेत, लवकरच फॉर्म्युला होईल. फॉर्म्युला निश्चित करण्याकरता आलो आहोत’, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगत अधिक काही बोलण्यास नकार दिला आहे.

मनसेचं शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरण होणार या केवळ चर्चा असल्या तरी अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत माहिती नाही. त्यामुळे या चर्चांचे पुढे काय होणार हे पहावे लागणार आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी जाहीर

अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ शकतो तिकीट !

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, महाविकास आघाडीत खळबळ

Bhutan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी

मोठी बातमी : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशाची तारिख ठरली

ब्रेकिंग : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय