Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याब्रेकिंग : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !

ब्रेकिंग : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !

SBI net banking : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. स्टेट बँकेच्या ग्राहक नियोजित क्रियाकलापांमुळे इंटरनेट बँकिंग सेवा वापरू शकणार नाहीत. अर्थात स्टेट बँकेची सर्व इंटरनेट सेवा 23 मार्च रोजी एक तासासाठी बंद असणार आहेत. बँकेच्या वतीने याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

एसबीआयने आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेच्या सर्व इंटरनेट सेवा उद्या 23 मार्च 2024 रोजी बंद राहणार आहे. एका तासासाठी या सेवा बंद असणार आहेत. या काळात SBI च्या नेट बँकिंग, YONO SBI, SBI मोबाइल बँकिंग अॅप आणि इतर इंटरनेट बँकिंग सेवा उपलब्ध नसतील. यामुळे देशातील SBI च्या तब्बल 44 कोटी ग्राहकांना फटका बसणार आहे.

स्टेट बँकेच्या वेबसाइटनुसार, नियोजित क्रियाकलापांमुळे 23 मार्च रोजी 01:10 ते 02:10 पर्यंत इंटरनेट सेवा कार्य करणार नाहीत. मूलभूत सेवांसाठी व्हॉट्सॲप बँकिंगच्या सेवांचा लाभ घेता येईल.

या काळात ग्राहकांना काय पर्याय उपलब्ध आहेत?

ग्राहकांना बँकेच्या शाखांमध्ये जाऊन व्यवहार करता येतील. बँकेने जारी केलेल्या चेकबुक आणि पासबुकचा वापर करून व्यवहार करता येतील. UPI आणि IMPS सारख्या इतर डिजिटल पेमेंट पर्यायांचा वापर करता येईल. याशिवाय तुम्ही एटीएममधूनही पैसे काढू शकता. तसेच, SBI संपर्क केंद्राद्वारे सेवा मिळवू शकता.

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय