Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याAnna Hazare : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया,...

Anna Hazare : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… 

नवी दिल्ली : कथित दारु घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना गुरूवारी रात्री अटक करण्यात आलेली आहे. तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली. या कारवाई विरोधात देशातील विविध ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या कारवाईवर आता अण्णा हजारे (Anna Hazare) यांची प्रतिक्रिया येत आहे.

अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधातील आंदोलनात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे सक्रिय होते. त्यांच्या अटकेवर आता केजरीवाल यांचे कधीकाळचे सहकारी आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी ‘माझ्यासोबत काम करणारे, दारूविरोधात आवाज उठवणारे अरविंद केजरीवाल आता दारू धोरण बनवत आहेत, याचं मला खूप वाईट वाटतं. त्यांची अटक त्यांच्याच कृत्यामुळे झाली आहे, असे ते म्हणाले आहे.

अण्णा हजारे म्हणाले की, मी मद्यधोरणावर अनेकवेळा पत्र लिहिले. माझा पत्र लिहिण्याचा उद्देश एकच होता. आज दारूमुळे महिलांवर अन्याय अत्याचार होतात. दारूमुळे खूनदेखील होतात. दारुची ही नीती संपवली पाहिजे. परंतु हे अरविंदच्या डोक्यात बसलं नाही. शेवटी त्यांनी मद्यविक्री धोरण जारी केले. माझ्यासोबत दारूविरोधात आवाज उठवणारे अरविंद केजरीवाल आता दारू धोरण बनवत आहेत, याचं मला खूप वाईट वाटतं. असेही ते म्हणाले.

तसेच, शेवटी त्याच मद्यनीतीमुळे त्याला अटक झाली. त्यामुळे आता तो आणि सरकार बघून घेतील. ज्यांची चूक झाली त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी माध्यमांना दिली आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर लोकसभा मतदारसंघात “या” दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय