Monday, May 20, 2024
Homeताज्या बातम्यास्वतंत्र भारतात पहिले मतदान कुणी केले माहित आहे का ? वाचा सविस्तर...

स्वतंत्र भारतात पहिले मतदान कुणी केले माहित आहे का ? वाचा सविस्तर !

Shyam Saran Negi : सध्या देशभरात लोकसभा निवडणूका सुरू आहेत. देशातील अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली आहे तर काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणे आणखी बाकी आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कोण होते ? आज आम्ही त्यांच्या बद्दल सांगणार आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार हे श्याम सरन नेगी (Shyam Saran Negi) होते. त्यांना भारतीय लोकशाहीचे ‘लिव्हिंग लेजंड’ असंही म्हणतात. शिमल्यापासून जवळपास 280 किमी दूर किन्नोर जिल्ह्यातील कल्पा गावात ते राहतात. श्याम सरन नेगी यांनी ऑक्टोबर 1951 मध्ये पहिल्यांदा लोकसभेसाठी मतदान केलं. त्यानंतर त्यांनी एकही निवडणूक चुकवली नाही. मग ती ग्रामपंचायतीची निवडणूक असो, विधानसभेची किंवा मग लोकसभेची निवडणूक.

स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत किन्नोरमध्ये 25 ऑक्टोबर 1951 रोजी मतदान झालं होतं. फेब्रुवारी-मार्च 1951 ला मतदान होणार होतं. मात्र किन्नोरमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे तिथे तब्बल पाच महिने आधीच मतदान घेण्यात आलं. त्यावेळी श्याम सरन नेगी यांनी स्वतंत्र भारतात पहिल्यांदा मतदान केले. त्यावेळी नेगी शेजारच्या मुरांग गावात शिक्षक होते.

श्याम सरण नेगी (Shyam Saran Negi) यांनी आपल्या दीर्घ आयुष्यात 33 वेळा मतदान केले. 2 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी पोस्टल बॅलेटद्वारे आपले शेवटचे मतदान केले आणि 05 नोव्हेंबर 2022 रोजी वयाच्या 106 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवार यांचे मोठे विधान

राज्यात ११ मतदारसंघात अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

बारामतीत पोलिसांच्या ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस ? रोहित पवारांचे गंभीर आरोप

‘EVM’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास अटक

TMC : टाटा स्मारक हॉस्पिटल येथे भरती

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय