Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : संभाजीनगरमध्ये पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी

PCMC : संभाजीनगरमध्ये पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी

पाण्याच्या नासाडी कडे नागरिकांसह महापालिकेचे दुर्लक्ष PCMC

पिंपरी-चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग दिवसाआड पाणीपुरवठा करत असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. (WATER WASTAGE) तीन दिवसापासून चिंचवड, संभाजीनगर येथील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे.

यामुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, पाईपलाईन फुटली यासंदर्भात ज्याचं नळ कनेक्शन ज्या व्यक्तीच्या नावे आहे त्या व्यक्तीने अथवा महापालिकेने त्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाही.

पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणारे मावळातील पवना धरण यंदा 92 टक्के भरले होते. परंतु, प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. pcmc news

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा असूनही पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी होत आहे.

आकुर्डी-चिखली रोड अत्यंत वर्दळीचा रस्ता असून दररोज लाखो नागरिक या रस्त्यावरून वाहतूक करत असतात. त्यांच्यापैकी एकही संवेदनशील नागरिक यासाठी पुढे आलेला दिसत नाही.

तसेच सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे कुठले संकेत नसल्याने स्थानिक कार्यकर्ते व नेते अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. pcmc news

पाणी बचतीचे नुसते प्रबोधन करून उद्दिष्ट साध्य होणार नाही, त्यासाठी छडी म्हणजे कायदा हातात घ्यावा लागेल, जोपर्यंत कायद्याचा धाक निर्माण होत नाही तोपर्यंत अशा घटना दैनंदिन घडत राहणार त्यामुळे आपण देशोधडीला लागणार हे निश्चित आहे.

शिवानंद चौगुले

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवार यांचे मोठे विधान

राज्यात ११ मतदारसंघात अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

बारामतीत पोलिसांच्या ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस ? रोहित पवारांचे गंभीर आरोप

‘EVM’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास अटक

TMC : टाटा स्मारक हॉस्पिटल येथे भरती

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय