Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPUNE : महिला दिनी वारांगनाचा सन्मान

PUNE : महिला दिनी वारांगनाचा सन्मान

मंथन फाउंडेशन आणि महाएनजीओ फेडरेशनचा उपक्रम

पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जातो.सार्वजनिक सभागृह, रामेश्वर मार्केट, बुधवार पेठ, पुणे येथे मंथन फाऊंडेशन व महाएनजीओ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने (RED LIGHT) वारांगनाचा सन्मान करण्यात आला. PUNE NEWS

श्री.शेखर मुंदडा ( महाराष्ट्र राज्य आयोग गोसेवा अध्यक्ष ) यांचा वाढदिवस  मंथन फाउंडेशन ने बुधवार पेठेतील वारांगनांचा सन्मान करून साजरा करण्यात आला. श्री. शेखर  मुंदडा हे नेहमी मंथन फाउंडेशनच्या माध्यमातून वारांगना आणि त्यांच्या मुलांसाठी मदत करत असतात. त्यांचा वाढदिवस बुधवार पेठ येथे साजरा करण्यासाठी मंथन फाऊंडेशनने पुढाकार घेतला. सुमधुर सनईवादनाच्या वातावरणात या महिलांनी औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक गणेश दत्त बाकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी ९० वारांगनांचा स्वयंपाकासाठी कढई देऊन सन्मान करण्यात आला. PUNE NEWS

मुकुंद शिंदे (संचालक,एनजीओ फेडरेशन) यांनी उपस्थित मान्यवर आणि वांरगनाचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे चेतन शर्मा ( नागरिक समस्या निवारण केंद्र, महाएनजीओ फेडरेशन कक्ष प्रमुख ) आणि मा. सुनील सुर्यवंशी ( गो आयोग सदस्य ) यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी. मंथन फाउंडेशन च्या अध्यक्षा आशा भट्ट – वेलणकर यांचा गोमय मुर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

मंथन फाउंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक कविता सुरवसे ह्यांनी सुत्रसंचालन केले. मंथन फाउंडेशन संस्थेचे दिपक निकम, सारिका पवार, श्रुतिका यादव, सुवर्णा पवार, बाबु शिंदे, सोनाली हांडे आणि पिअर्स आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय