Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याArvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

नवी दिल्ली : कथित दारु घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आलेली आहे. तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे. Chief Minister Arvind Kejriwal arrested

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात केजरीवाल यांनी धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची याचिका फेटाळून लावत मोठा झटका दिला. आता केजरीवालांवर अटक करण्यात आली आहे.

ईडीचे पथक केजरीवालांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. नऊ समन्सनंतरही चौकशीला न जाणं केजरीवालांना महागात पडली आहे. आता दोन तासांच्या चौकशीनंतर केजरीवालांना अटक करण्यात आली आहे.

ईडीद्वारे केल्या जाणाऱ्या सक्तीच्या कोणत्याही कारवाईपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी करत केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, या प्रकरणात कोणताही दिलासा देण्यास दिल्ली हायकोर्टाने नकार दिला. कोर्टाच्या निर्णयानंतर पुढच्या काहीच तासात ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांची चौकशी सुरु केली.

दरम्यान, त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. महत्त्वाचे म्हणजे दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात अरविंद केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काय निर्णय देते याबाबतही उत्सुकता आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर लोकसभा मतदारसंघात “या” दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय