Thursday, May 9, 2024
HomeराजकारणRaj Thackeray: राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही –...

Raj Thackeray: राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

महाड : ‘मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांना महायुतीत घेण्याची कोणतीही आवश्यकता नसून त्यांना घेतल्याने काहीही फरक पडणार नाही!’ असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते तथा खासदार रामदास आठवले (Ramdas athavale) यांनी महाडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेच्या दरम्यान केले आहे.

खासदार रामदास आठवले (Ramdas athavale) हे महाड येथे चवदारतळे सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने आले असता त्यांनी हॉटेल विसावा या ठिकाणी जाहीर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना आठवले म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिपत्याखाली देशाचा कारभार सुरळीत चालू असून काँग्रेसच्या कालावधीत कोणतीही विकासकामे झाली नसून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रलंबित स्मारके देखील जी काँग्रेस कार्यकाळात कधीही होऊ शकली नाहीत ती नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झाली असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. (Raj Thackeray)

भारतीय जनता पार्टी संविधान संपवित आहे अशी निव्वळ अफवा असल्याचे सांगत काँग्रेस तसेच इतर विरोधी गटातर्फे ही अफवा पसरविण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी हे सबका साथ सबका विकास या मार्गाने चालणारे आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात संविधानिक मार्गाने विविध निर्णय घेतले गेल्याचे देखील त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आरपीआय पक्षाला किमान दोन जागांची अपेक्षा आहे आणि तशी मागणी सुद्धा आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु याबाबत एन डी ए तर्फे वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला जाईल तो मान्य असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साथीने आपकी बार चारसो पार निश्चित करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

तसेच, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीला त्या पक्षांचे प्रमुख नेतेच जबाबदार असल्याचा आरोप करीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या आधीच आपल्या सर्व आमदारांशी चर्चा करून त्यांना गटबाजी करण्यापासून रोखायला हवे होते, असेही मत त्यानी व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेला आरपीआय तर्फे अनिरुद्ध म्हाशेकर, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, जिल्हा युवा अध्यक्ष प्रमोद महाडिक, कोकण युवा अध्यक्ष शेखर सकपाळ, महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे, तालुका सेक्रेटरी लक्ष्मण जाधव, दलितमित्र दादासाहेब मर्चंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर लोकसभा मतदारसंघात “या” दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय