Monday, May 20, 2024
Homeजिल्हाKolhapur: 40 किलो अफू व 1 किलो गांजासह तिघे एलसीबीच्या ताब्यात

Kolhapur: 40 किलो अफू व 1 किलो गांजासह तिघे एलसीबीच्या ताब्यात

कोल्हापूर / यश रुकडीकर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ, मद्य विक्री व साठा करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. Kolhapur

या अनुषंगाने तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पेठ वडगाव येथे पुणे- बेंगलोर हायवे जवळ असलेल्या हॉटेल जंम्भेश्वरायच्या मागील बाजूस असलेल्या एका खोलीमध्ये अफूच्या बोंडाचा साठा करून त्याची पावडर तयार केली जाते व गांजाचा साठा विक्रीसाठी ठेवला जातो. Kolhapur

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी शाखेकडील सपोनि सागर वाघ व पथकासह दि.19 रोजी या ठिकाणी छापा टाकून आरोपी 1) मनिष मोहनराम, वय 23, धंदा.हॉटेल मजुरी, रा.समराथल हॉटेल, ओमसाई पेट्रोल पंप शेजारी, पेठ वडगाव, कोल्हापूर व 2)मोहन चोकलू चव्हाण, वय 45, व्यवसाय चप्पल दुकान, रा.हिंदमाता कॉलनी, ता. हातकणंगले, कोल्हापूर. 3) अमीर सय्यद जमादार वय 40, धंदा ट्रक मेकॅनिक, रा.प्रसाद हॉटेल मागे, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, कोल्हापूर हे तीन आरोपी सापडले. त्या ठिकाणी 40 किलो 4 ग्रॅम वजनाचा अफू,1 किलो 195 ग्रॅम वजनाची पावडर व 1 किलो गांजा असा एकूण 5 लाख 21 हजार 400 रुपये किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा मिळून आला. आरोपींविरुद्ध पेठ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सपोनि सागर वाघ, सहा.फौजदार विजय गुरखे, पोहेकॉ.विलास किरोळकर, नामदेव यादव, सचिन देसाई, महेश गवळी, अमित सर्जे, सागर चौगुले, प्रविण पाटील, विनोद कांबळे, महादेव कुहाडे व चालक सुशील पाटील यांनी केली.

whatsapp link

हे ही वाचा :

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर लोकसभा मतदारसंघात “या” दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय