Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पंतप्रधान नरेंद्र मोदींची जुलमी राजवट लवकरच संपुष्टात येईल  - मीना...

PCMC : पंतप्रधान नरेंद्र मोदींची जुलमी राजवट लवकरच संपुष्टात येईल  – मीना जावळे

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरीत आंदोलन

भाजप  कार्यालयासमोर ‘आप’ व इंडिया आघाडीच्या घटक पक्षातर्फे तीव्र निषेध

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : ( दि.२२ ) आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी ( AAP ) व इंडिया आघाडीच्या वतीने पिंपरी, मोरवाडी येथील भाजप कार्यालयासमोर (PCMC) जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे नेते माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी निषेध नोंदविताना सांगितले की, –भारतामधील प्रमुख विरोधी पक्षा मधील एक बुलंद आवाज बंद करायचा असल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे, सध्या भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत व सर्वेनुसार भारतीय जनता पक्षाला 150 जागा सुद्धा मिळणे कठीण आहे, त्यामुळे बिथरल्या सारखे भारतीय जनता पक्ष काम करत आहेत. काही दिवसापूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री  हेमंत सोरेन व आत्ता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक त्याच भीतीने केली आहे. आम्ही ह्या घटनेचा विरोध करत आहोत. PCMC NEWS

पिंपरी चिंचवडच्या ‘ आप ‘ शहराध्यक्ष मीना जावळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की,
—2014 पासून भारतामध्ये एका जुलमी हुकमशहाचा जन्म झाला व भारताला जर्मनीच्या हिटलरशाही मार्गावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू केला परंतु इतिहास साक्षीदार आहे, जेव्हा हुकूमशहा जन्माला येतो तेव्हा तेव्हा भगतसिंग सुद्धा जन्म घेतात, आपच्या प्रमुख चार नेत्यांना BJP सरकारने सुडुबुद्धीने अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हि जुलमी राजवट लवकरच संपुष्टात येईल, आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून देऊ.

ह्यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या डॉ. मनिषा गरुड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे सागर चिंचवडे, भोंडवे, सीपीएम चे गणेश दराडे, समाजवादी पक्षातर्फे यादव जी, संभाजी ब्रिगेड चे प्रविण कदम, आपचे राज्य पदाधिकारी चेतन बेंद्रे, मयूर दौंडकर तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे नेते व आपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने या अटकेचा विरोध केला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय