Friday, May 17, 2024
Homeजिल्हाKolhapur : मोटर सायकल चोरी करणारा आरोपी गजाआड

Kolhapur : मोटर सायकल चोरी करणारा आरोपी गजाआड

कोल्हापूर / यश रुकडीकर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वाहन चोरीचे गुन्ह्यात वाढ झाल्याने घडलेले गुन्हे उघडकीस आणणेकामी तसेच घडणारे गुन्ह्यांना प्रतिबंध होणे करीता पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.

वरीष्ठांकडून प्राप्त झाले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी त्यांचे शाखेकडील वेगवेगळी तपास पथके तयार करुन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे प्रयत्न चालू असताना पोलीस अमंलदार बालाजी पाटील व अशोक पोवार यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार रफिक मुल्ला, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर याचेकडे चोरीची सीबीझेड एक्स्ट्रीम मोटर सायकल असून तो सदरची मोटर सायकल घेवून दि.20 मार्च 2024 रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ते सरनोबतवाडी जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या टोल नाक्याजवळ येणार आहे. Kolhapur

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने नमुद ठिकाणी सापळा लावून आरोपी रफिक सलिम मुल्ला, व.व. 39, रा. गजानन महाराज मठासमोर, खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, मुळ रा. सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर यास अटक केली.

त्याच्या ताब्यातील चोरीची काळ्या रंगाची सीबीझेड एक्स्ट्रीम मोटर सायकल यावेळी हस्तगत करण्यात आली. त्याचे कब्जात मिळालेली विना नंबरप्लेट मोटर सायकलबाबत चौकशी केली असता ती चोरीची असून नमुद मोटर सायकल चोरीस गेल्याची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 185/2024, भा.द.वि.स. क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल असलेची खात्री झाली. त्यानंतर त्याच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्याने यापुर्वी चोरलेली व त्याच्या खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील घराजवळ लावलेली आणखी एक विना नंबरप्लेटची स्प्लेंडर मोटर सायकल दाखविली. सदरची मोटर सायकल देखील चोरीची आढळून आली. एकूण 1 लाख रूपये किंमतीच्या दोन मोटर सायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

आरोपीकडून राजारामपुरी पोलीस ठाणे, गु.र.नं. 185/2024 व विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली गु.र.नं.54/2024, भा.द.वि.स.क. 379 असे एकूण 02 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीस पुढील कारवाई करीता राजारामपुरी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खोटमोडे-पाटील व श्रीमती जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अमंलदार बालाजी पाटील, अशोक पोवार, वसंत पिंगळे, हिंदुराव केसरे, अमर आडूळकर व संतोष पाटील यांनी केली आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय