Tuesday, May 7, 2024
Homeताज्या बातम्याCongress Loksabha list: काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी जाहीर

Congress Loksabha list: काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी जाहीर

Congress Loksabha candidate list : काँग्रेसच्या गोटातून एक महत्वाची बातमी येत आहे. काँग्रेसने राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी (Congress Loksabha candidate list) जाहीर केली आहे. काँग्रेसने यापूर्वी राज्यातील 7 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज (दि.23) काँग्रसने राज्यातील 4 उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात एकूण ४५ उमेदवारांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने देशपातळीवर चौथी यादी (Congress Loksabha list) जाहिर केली आहे. काँग्रेसच्या चौथ्या यादीत आसाममधील एक, अंदमान आणि निकोबारमधील एक, छत्तीसगडमधील १, जम्मू-काश्मीरमधील २, मध्य प्रदेशधील १२, मणिपूरमधील २, मिझोराममधील १, राजस्थानमधील ३, तामिळनाडूमधील ७, उत्तर प्रदेशमधील ९, उत्तराखंडमधील २ तर पश्चिम बंगालमधील एका तर या यादीत महाराष्ट्रातील ४ उमेदवारांचा समावेश आहे.

काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार

कोल्हापूर- शाहू महाराज, पुणे- रविंद्र धंगेकर, नंदुरबार- गोवाल पाडवी, सोलापूर- प्रणिती शिंदे, लातूर- शिवाजी कालगे, नांदेड- वसंत चव्हाण, अमरावती- बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली.

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार

रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा-गोंदियामधून प्रशांत पडोळे, नागपूरमधून विकास ठाकरे, गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांना दुसऱ्या यादीत उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात आता पर्यत एकूण ११ उमेदवारांची घोषणा झाली आहे.

नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने विकास ठाकरे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र नाना पटोले यांचा तब्बल २ लाख ८४ हजार मतांनी पराभव झाला होता.

whatsapp link

हे ही वाचा :

अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ शकतो तिकीट !

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, महाविकास आघाडीत खळबळ

Bhutan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी

मोठी बातमी : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशाची तारिख ठरली

ब्रेकिंग : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय