Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीयNarendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

Narendra Modi : भूतानमध्ये थिम्पू येथील तेंद्रेलथांग येथे एका सार्वजनिक समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानच्या (BHUTAN ) राजांच्या हस्ते ‘ऑर्डर ऑफ ड्रुक ग्याल्पो’ सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भूतानचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पहिल्यांदाच हा प्रतिष्ठेचा पुरस्कार एका परदेशी नेत्याला मिळाला आहे. डिसेंबर 2021मध्ये थिम्पूत ताशीछोडझोंग येथे झालेल्या भूतानच्या 114 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात भूतानचे राजे यांनी हा पुरस्कार जाहीर केला होता. PM Narendra Modi

कोरोनासारख्या जागतिक संकटात भारताने भूतानला  हरतऱ्हेची मदत केली. त्यामुळेच भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आणि सहकार्य या आधारे हा पुरस्कार देण्यात आला.

भारत-भूतान मैत्री मजबूत करण्यासाठी मोदी यांनी दिलेले योगदान तसेच त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची दखल घेत मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महासत्ता म्हणून भारताचा उदय झाला असून त्यांच्या कार्यकाळातच भारताचा भूतानशी विशेष बंध तयार झाल्याने हा पुरस्कार देऊन मोदी यांचा गौरव करण्यात आला. मोदींच्या नेतृत्वाने भारताला परिवर्तनाच्या मार्गावर आणले आहे, त्यांच्यामुळे भारताचे जागतिक पातळीवर नैतिक अधिपत्य  आणि  प्रभाव वाढला आहे असे प्रशस्तीपत्रात नमूद केले आहे. BHUTAN NEWS

भूतान नरेंद्र मोदी यांचे जोरदार शाही स्वागत करण्यात आले, हा पुरस्कार 1.4 अब्ज भारतीयांचाच सन्मान असून दोन्ही देशांमधील विशेष आणि अनोख्या संबंधांचे हे द्योतक असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

मानांकन आणि प्राधान्यानुसार, ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो हा सन्मान भूतानमधे जीवनगौरव म्हणून सुरू करण्यात आला आहे. भूतानमधील हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे जो सर्व सन्मान आणि पदकांमध्ये सर्वोच्च आहे.

याआधी 2020 मध्ये मोदींना यूएस सरकारचा यूएस सशस्त्र दलाचा पुरस्कार लीजन ऑफ मेरिट मिळाला आणि 2019 मध्ये, रशियाने मोदींना आपला सर्वोच्च नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू’ पुरस्कार प्रदान केला.

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, महाविकास आघाडीत खळबळ

अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ शकतो तिकीट !

ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी

मोठी बातमी : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशाची तारिख ठरली

ब्रेकिंग : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !

किल्ले शिवनेरीवर जाताय? वन विभागाने घेतलेला निर्णय आवश्यक वाचा!

ब्रेकिंग : बिहार कोसी नदीवरील मोठा पूल कोसळला, एक ठार,अनेक जखमी

ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय