Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याSwara Bhaskar : अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ...

Swara Bhaskar : अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ शकतो तिकीट !

मुंबई : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुक जाहीर केली आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेसने राज्यातील ७ उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. अशात आता अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू झाली आहे.

कॉंग्रेसकडून अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) यांना उमेदवारी देण्याबाबतच्या चर्चांंना उधान आले आहे. स्वरा भास्कर नेहमीच आपल्या बेधडक मतांनी राजकीय वर्तूळात चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील स्वरा भास्कर ऍक्टीव्ह असते. सोशल मीडियावरून स्वरा भास्कर मोदी सरकार सातत्याने टीका करताना दिसते. अशा स्वरा भास्कर राजकारणात प्रवेश करणार असून काँग्रेसमधून निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे.

कॉंग्रेसने जाहिर केलेल्या उमेदवारांमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून अभिनेता राज बब्बर तसेच अभिनेत्री स्वरा भास्करचे नाव चर्चेत आले आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत स्वरा भास्कर सहभागी झाल्या होत्या. स्वरा भास्कर या काँग्रेसच्या जवळ असल्याचे मानले जाते. त्यामुळे स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिला महाराष्ट्रातील मुंबईतील मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

महाराष्ट्रात कॉंग्रेसकडून ४८ लोकसभा मतदारसंघापैकी ०७ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये लातुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. शिवाजीराव काळगे, सोलापुर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे, नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून गोवल पाडवी, कोल्हापुर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज, अमरावती लोकसभा मतदारसंघातून बळवंत वानखेडे, पुणे लोकसभा मतदारसंघातून रविंद्र धंगेकर, नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलीय.

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी

मोठी बातमी : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशाची तारिख ठरली

ब्रेकिंग : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !

किल्ले शिवनेरीवर जाताय? वन विभागाने घेतलेला निर्णय आवश्यक वाचा!

ब्रेकिंग : बिहार कोसी नदीवरील मोठा पूल कोसळला, एक ठार,अनेक जखमी

ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

संबंधित लेख

लोकप्रिय