Sunday, May 12, 2024
HomeआंबेगावShivajirao Adhalrao Patil : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशाची तारिख...

Shivajirao Adhalrao Patil : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशाची तारिख ठरली

Shivajirao Adhalrao Patil : शिरूर लोकसभा मतदार संघातून एक महत्वाची बातमी येत आहे. माजी खासदार तथा शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे २६ तारखेला राष्ट्रवादी (अजित पवार) गटात प्रवेश करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी (अजित पवार) प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.

अजित पवारांनी आज मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीला अनेक आमदार उपस्थित होते तसेच शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना देखील बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. आज सकाळी 10 वाजता मुंबईत देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत २६ तारखेला शिवाजीराव आढळराव पाटीलांचा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय झाला आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघातील आंबेगावच्या परिसरात शिवाजीराव आढळराव पाटीलांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले. तसेच शिरूर मध्ये आमचा उमेदवार जास्तीत जास्त अधिक मते घेऊन विजयी होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महायुतीमध्ये शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडे गेली असून त्या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे शिवाजीराव आढळराव पाटील आता हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवार गटात आज प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता २६ मार्च ला पक्ष प्रवेश होणार असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय