Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याBIHAR : बिहार कोसी नदीवरील मोठा पूल कोसळला, एक ठार, अनेक जखमी

BIHAR : बिहार कोसी नदीवरील मोठा पूल कोसळला, एक ठार, अनेक जखमी

BIHAR ACCIDENT : बिहारमधील सुपौल येथील कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या रोड ब्रिजचा एक भाग कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, ९ जण जखमी झाले आहेत. पहाटे (दि.२२) झालेल्या या अपघातात जवळपास २० मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत ८ मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. यातील ८ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. BIHAR ACCIDENT

सुपौलचे जिल्हा दंडाधिकारी कौशल कुमार यांनी सांगितले की, ‘भेजा आणि बकौर जिल्ह्यांदरम्यान मरीचाजवळ बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाचा भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहेत.

भारत सरकारच्या भारतमाला प्रकल्पांतर्गत, सुपौल येथे देशातील सर्वात लांब पूल बांधल्या जात आहे. जवळपास १२०० कोटी रुपये खर्च करून या पुलाचे बांधकाम केले जात आहे. याची लांबी १०.२ किमी पेक्षाही अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
ट्रान्स रेल कंपनीद्वारे पुलाचे बांधकाम केले जात आहे. BIHAR ACCIDENT

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय