Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ज्या कुटुंबामध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य ते कुटुंब सक्षम - स्नेहल...

PCMC : ज्या कुटुंबामध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य ते कुटुंब सक्षम – स्नेहल पटवर्धन

श्रीनिवास होल्डिंग प्रा. लि. कंपनीचा ग्राहक मेळावा संपन्न

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : ( दि. २३ ) – ज्या कुटुंबामध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य दिले आहे ते कुटुंब सक्षम पणे स्थिरस्थावर झाल्याचे दिसते. योग्य आर्थिक व्यवस्थापन करून बदलत्या काळातील नवतंत्रज्ञान आत्मसात करीत आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी पुरुषांबरोबरच महिलांनी देखील सहभाग घेतला पाहिजे. अनुभवी सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य नियोजन केले तर प्रत्येकाला सुरक्षित आर्थिक उद्दिष्ट गाठता येते असे प्रतिपादन श्रीनिवास होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक स्नेहल पटवर्धन यांनी केले. PCMC

श्रीनिवास होल्डिंग प्रा. लि. कंपनीच्या ग्राहक आणि हितचिंतकांचा ग्राहक मेळावा शुक्रवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आले होता. यावेळी कंपनीच्या वतीने ‘बदलत्या काळाची गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट विषयी थोडक्यात’ या माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. PCMC

यावेळी डॉ. जगदीश ढेकणे, आनंद मुथा, मुकुंद नेहारकर कंपनीचे संचालक सुहास गनबोटे, अरुणा गनबोटे, स्नेहल पटवर्धन व गायक चैतन्य कुलकर्णी आदी उपस्थित होते.

चैतन्य कुलकर्णी व सह कलाकारांनी हिंदी, मराठी चित्रपट व पारंपारिक गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

ओंकार पटवर्धन यांनी आर्थिक व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, आर्थिक नियोजन हा खूप मोठा आणि कधीही न संपणारा विषय आहे. यामध्ये बरेच टप्पे आहेत. पण कुठून तरी सुरुवात होणे महत्त्वाचे आहे. बाजारामध्ये अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूक करताना त्या गुंतवणुकीची सुरक्षितता, तरलता, कर, परतावा, अनुकूलता आणि गुंतवणुकीची वेळ याचा प्राधान्याने विचार करावा.

सुरक्षिततेसाठी आयुर्विमा, अपघात विमा, तसेच अचानकपणे उद्भवणाऱ्या वैद्यकीय उपचारांसाठी राखीव निधी, दीर्घकालीन ठेव योजना, आवर्तक ठेव योजना, एसआयपी (पद्धतशीर गुंतवणूक योजना), एसडब्लूपी याबाबत माहिती घ्यावी. आधी घर घ्यावे की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. निवृत्तीनंतरची आर्थिक गरज याविषयी ओंकार पटवर्धन यांनी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. PCMC NEWS

श्रीनिवास होल्डिंग प्रा. लि. कंपनीच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून लायन्स क्लब ऑफ चिंचवड (CHINCHWAD) या संस्थेला लवळे येथील डेंटल क्लिनिक मधील गरीब रुग्णांना सेवा देण्यासाठी आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.

निवडक ग्राहकांनी आपले कंपनीच्या सेवा सुविधा विषयी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.स्वागत स्नेहल पटवर्धन, सूत्रसंचालन आणि आभार प्राजक्ता मांडके यांनी मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय