Sunday, April 28, 2024
Homeबॉलिवूड'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटासाठी अंकिता लोखंडेनं एकही रूपया घेतला नाही; वाचा...

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटासाठी अंकिता लोखंडेनं एकही रूपया घेतला नाही; वाचा काय आहे कारण !

Ankita Lokhande : रणदीप हुड्डा यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर (Sandyara Veer Savarkar) हा सिनेमा गेल्या शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, या चित्रपटाची देशभरामध्ये जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा (Randeep Hooda) यांनी स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमामध्ये विनायक दामोदर सावरकरांनी देशासाठी केलेली क्रांती, सावरकरांना देण्यात आलेली काळ्या पाण्याची शिक्षा आणि त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीवर आधारित आहे.

स्वातंत्र्य वीर सावरकर (Sandyara Veer Savarkar) यांची भूमिका अभिनेता रणदीप हुड्डानं साकारली आहे. तर सावरकर यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री अंकिता लोखंडेनं (Ankita Lokhande) केली आहे. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वत: रणदीप हुड्डानं केलं आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांना मोठ्या अर्थिक संकटांना तोंड द्यावं लागलं असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी रणदीप हुड्डानं (Randeep Hooda) आपलं घर विकलं असल्याची देखील चर्चा आहे.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटासोबतच सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई यांची भुमिका साकारणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्याही अभिनयाचे कौतुक होत आहे. अंकिताची भूमिका सर्वात लक्षवेधी भूमिका मानली जात आहे. आता या चित्रपटाच्या निर्मात्यानी अभिनेत्री अंकिता लोखंडेने चित्रपटासाठी एक रुपयाही घेतला नसल्याचा खुलासा केला आहे.

चित्रपटासाठी एकही रूपया घेतला नाही

स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांना अर्थिक संकटांना तोंड द्यावं लागलं होतं. ते हा सिनेमा घेऊन माझ्याकडे आले होते. सिनेमाच्या बजेटचं त्यांच्यावर टेन्शन होतं. त्यावेळी मी ठरवलं की यांना आपण साथ देऊ…त्यामुळे मी एकही रूपया घेतला नाही, असं अंकिता लोखंडे म्हणाली.

whatsapp link

हे ही वाचा :

अंगाला रंग लावून दोन मुलींचे अश्लिल चाळे, मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल !

शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….

मोठी बातमी : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी जाहीर

अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ शकतो तिकीट !

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, महाविकास आघाडीत खळबळ

Bhutan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय