Sunday, May 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महिलांनी राजकारणात यावे - खासदार मेधा कुलकर्णी

PCMC : महिलांनी राजकारणात यावे – खासदार मेधा कुलकर्णी

आगरवाल फेडरेशनतर्फे कृष्णामाई मित्तल यांना जीवनगौरव पुरस्कार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : कोणतेही क्षेत्र वाईट नसते, वाईट असते ती व्यक्ती . सर्व क्षेत्रात वाईटपणा तर आहेच. जर महिला राजकारणात आल्यास हे क्षेत्र चांगले होईल. असे मत राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. PCMC NEWS

आगरवाल समाज फेडरेशन, पुणेच्या वतीने यांना जीवनगौरव पुरस्काराने कृष्णामाई प्रेमचंद मित्तल यांना सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना माता माधवी अग्र गौरव पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी अभिनेत्री ईशा आगरवाल, पंजाबी मॉडेल गुरप्रीतकौर मान, फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विनोद शि.बंसल, सचिव सीए के.एल बंसल, राजमाला कृष्णकुमार गोयल, कोषाध्यक्ष श्याम बंसल महिला समिती अध्यक्षा अनिता आगरवाल मान्यवर उपस्थित होते.

खासदार प्रा. कुलकर्णी पुढे म्हणाल्या कि,
आजकाल दहावी – बारावी सह सर्व स्पर्धा परीक्षेत मुली आपल्या मेहनतीने अग्रेसर असतात.

महिलांचे अंतर्मन सुंदर आहेत म्हणून बाह्य सौंदर्य खुलून दिसते. घरगुती असो कि कार्यालयीन कामात त्या प्रामाणिक असतात. कुटुंबासोबत वचनबद्ध असतात. महिलांना पुढे जाण्यासाठी पुरुषांनी प्रेरणा दिल्यास, त्यांना सहकार्य केल्यास महिलांच्या हातून उत्कृष्ट कार्य घडेल. PCMC NEWS

कृष्णकुमार गोयल म्हणाले कि, आगरवाल समाजात एकसे बढकर एक हिऱ्यांसारख्या व्यक्ती आहे. त्यांना समाजासमोर आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपल्या समाजात सुरुवाती पासूनच महिलांना मानाचे स्थान आहे. माता माधवी आणि माता महालक्ष्मी या आपल्या समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहेत.

समाजातील प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार कृष्णा प्रेमचंद मित्तल यांना तर शतायुषी बिमला बुलचंद गोयल, तर आदर्श माता – शोभा गुप्ता, प्रकाशी बन्सल यांना प्रदान करण्यात आला.

कु.निती अग्रवाल(क्रीडा), कु. याना अग्रवाल, आदर्श गृहिणी – अलका जालान, श्रीमती बिमला अग्रवाल, काल आज आणि उद्या – श्रीमती कृष्णा गोयल, गीता गोयल, पूजा गोयल, रजनी गोयल, धार्मिक क्षेत्रातील रजनी श्रीकिशन गोयल, सुनीता बन्सल, सांस्कृतिक क्षेत्रातील सुनीता गर्ग, राजकीय क्षेत्रातील शोभा सुरेश लोहिया, कायदा व सुव्यवस्था क्षेत्रातील सुनीता बन्सल, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. चेतना अग्रवाल, शैक्षणिक क्षेत्रातील आरती गुप्ता, व्यावसायिक क्षेत्र पूनम गुप्ता, उद्योजकता क्षेत्रातील कोमल अग्रवाल, कु. भाविका गुप्ता, कु. कनक मित्तल, कु. तानिया संदीप गुप्ता, पत्रकारिता क्षेत्र, कु. नेहा बन्सल-अग्रवाल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आगरवाल समाज फेडरेशनचे सचिव के.एल.बंसल, उपाध्यक्ष विनोद बन्सल यांनी फेडरेशन च्या कार्याची माहिती दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीना गोयल, उषा तुलश्यान, लक्ष्मी बन्सल, विकास गर्ग, दीपक विश्वकर्मा आदींनी विशेष सहकार्य केले.

याशिवाय पुणे अग्रवाल समाजाच्या महिला अध्यक्षा भारती जिंदाल, गोल्डन क्लबच्या माजी अध्यक्षा सरस्वती गोयल, विद्यमान अध्यक्ष गोयल, युवा अध्यक्ष विकास गर्ग, पंकज अग्रवाल, हितेश अग्रवाल, वेदप्रकाश गुप्ता, डॉ.बालकिशन अग्रवाल पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय