Sunday, April 28, 2024
Homeताज्या बातम्याPrakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीने (Vanchi Bahujan Aaghadi) महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. वंचित बहुजन आघाडीने आपल्या लोकसभा उमेदवारांची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले.

गेल्या काही दिवसांपुर्वी वंचित बहुजन आघाडीचे (Vanchi Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करत निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची युती होणार असल्याचे चर्चा होत्या. मात्र आज अखेर वंचितने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

वंचित बहुजन आघाडीने आपल्या ७ उमेदवारांची घोषणा केली आहे. तर सांगली लोकसभेच्या जागेवर ओबीसी बहुजन पार्टीचे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. या सोबतच नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

वंचितची पहिली उमेदवार यादी जाहीर

भंडारा-गोंदिया : संजय केवट
गडचिरोली : हितेश पांडुरंग मडावी
चंद्रपूर : राजेश बेले
बुलडाणा : वसंतराव मगर
अकोला : प्रकाश आंबेडकर
अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम : खेमसिंह पवार

प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत जागावाटपावर चर्चा सुरू होती. मात्र, आता ही बोलणी फिस्कटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकोल्यातील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

‘बदला’ घेणे एवढाच उद्देश; डॉ.अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका

वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय