Bihar : राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) नेतृत्वाखालील महाआघाडीने आज जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. स्वतः ‘राजद’ 26 जागांवर निवडणूक लढणार असून काँग्रेसच्या वाट्याला 9 जागा आल्या आहेत. Bihar Loksabha
आघाडीत समावेश असलेल्या डाव्या पक्षाच्या वाट्याला 5 जागा आल्या आहेत. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी- लेनिनवादी) यांना तीन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार मनोजकुमार झा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेशप्रसाद सिंह आणि डाव्या आघाडीचे नेते उपस्थित होते. या बैठकीतच उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
गया, औरंगाबाद, जामुई आणि नवादा येथून राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर बेगुसराय आणि खगरिया हे दोन मतदारसंघ भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वाट्याला आहेत.
2019 मध्ये बेगुसराय येथून कन्हैय्याकुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढविली होती. तिथे त्यांचा सामना भाजपच्या गिरीराजसिंह यांच्याशी झाला होता. त्या निवडणुकीत कन्हैय्याकुमार हे पराभूत झाले होते. सध्या कन्हैय्याकुमार हे काँग्रेसमध्ये असून त्यांना पुन्हा येथून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे. पण त्याबाबत अंतिम निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाऊ शकतो.
भाजपलाही जागा जिंकाव्या लागणार!
भाजपाला 400 पार चे स्वप्न साकार करायचे असेल तर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपासाठी बिहार राज्य अत्यंत महत्त्वाचे आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 40 पैकी 39 जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता देखील सर्वाधिक जागा भाजप आणि मित्रपक्षांना जिंकाव्या लागतील.


हे ही वाचा :
जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात 9 शेळ्यांचा मृत्यू
ब्रेकिंग : व्हाट्सॲपवर निवडणूकीचा प्रचार करणाऱ्यावर मोठी कारवाई
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!
मध्यरात्री शेकडो विद्यार्थिनींचे कुलगुरूंच्या बंगल्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध
अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश
मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर