पिंपरी चिंचवड – दोन एप्रिल हा दिवस जागतिक ऑटिझम ( स्वमग्न)जागरूकता दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. ऑटिझम बालकांना त्यांच्या वेगळेपणासह समजून घेणे. ऑटिजन्स स्पेक्ट्रम डिसऑर्डर(ASD) या आजाराविषयी जागरूकता निर्माण करणे हा उद्देश या दिवसाचा आहे. त्यानिमित्ताने 2 एप्रिल 2025 रोजी “अभिराज फाउंडेशन “वाकड या ऑटिझम विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस साजरा करण्यात आला. (PCMC)
यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले अंतरशालेय चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर विद्यार्थी, शिक्षक, पालकांचे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले विद्यार्थ्यांना पाव भाजी व गुलाबजाम असे स्वादिष्ट भोजन देण्यात आले. (PCMC)

यानंतर विद्यार्थ्यांनी मनसोक्त नृत्य करून आपला आनंद व्यक्त केला. वैशाली खेडेकर, स्मिता हांडे, भाग्यश्री कापसे, विद्या रूपनाळकर, अंजना चिंगरे, योगिता वंजारी या शिक्षिकांनी या कार्यक्रमाची नियोजन केले होते, तर पटेकर, कांबळे व मारणे मावशी सहाय्य केले होते. जागतिक ऑटिझम जागरूकता दिनानिमित्त अभिराज फाउंडेशनचे डायरेक्टर स्वाती तांबे व रमेश मुसूडगे मुख्याध्यापिका अनिता चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.