नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर “रेसिप्रोकल टॅरिफ” लादण्याची घोषणा केली आहे. (Donald Trump Tariff) या निर्णयानुसार, भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे भारताच्या निर्यात क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी हा निर्णय २ एप्रिल रोजी व्हाइट हाऊसमधील रोझ गार्डन येथे “लिबरेशन डे” म्हणून घोषित करताना जाहीर केला. त्यांच्या मते, भारत अमेरिकन वस्तूंवर सरासरी ५२ टक्के शुल्क आकारतो, तर अमेरिका भारतावर कमी शुल्क लादत होती. (हेही वाचा – यूपी सरकारच्या बुलडोजर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका, 60 लाख रुपयांचा दंड, पीडितांना नुकसान भरपाईचे आदेश)
भारतावर 26 टक्के आयात शुल्क | Donald Trump Tariff
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, पंतप्रधान मोदींशी नुकतीच भेट झाली आहे आणि ते माझे चांगले मित्र आहेत, परंतु भारत आम्हाला योग्य वागणूक देत नाही. ते आमच्याकडून ५२ टक्के शुल्क आकारतात आणि आम्ही त्यांच्याकडून जवळजवळ काहीही आकारत नाही,” असे त्यांनी रोज गार्डनमधील “मेक अमेरिकन वेल्थी अगेन” कार्यक्रमात भाषणात ट्रम्प यांनी म्हटले होते. (हेही वाचा –धक्कादायक : नवरदेव पसंत नव्हता, नवरीनेच दिली हत्येची सुपारी)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी अनेक देशांवर नवीन जशास तसे आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार भारतावर २६ टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे.
या आयात शुल्कात वाढ केल्याने कृषी, मौल्यवान खडे, रसायन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती आणि यंत्र निर्मिती क्षेत्रांवर परिणाम होण्याचा अंदाज आहे. औषध निर्माण, वैद्यकीय साहित्य निर्मिती क्षेत्रावर सुद्धा परिणाम होण्याचा अंदाज आहे. (हेही वाचा – शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अजित पवारांचे मोठे विधान)
ट्रम्प यांनी बुधवारी घोषणा केल्याप्रमाणे, जपानवर २४ टक्के, दक्षिण कोरियावर २५ टक्के, मलेशियावर २४ टक्के, युरोपियन युनियनवर २० टक्के तर ब्रिटनवर ३२ टक्के टेरिफ आकारण्यात आले आहे.
भारत-अमेरिका व्यापार संबंध
२०२३-२४ मध्ये अमेरिका ही भारताची सर्वात मोठी व्यापारी भागीदार होती. भारताने अमेरिकेला ७७.५ अब्ज डॉलरची निर्यात केली, तर अमेरिकेकडून ४२.२ अब्ज डॉलरची आयात केली. यामुळे भारताला ३५.३२ अब्ज डॉलरचा व्यापार अधिशेष मिळाला. (हेही वाचा – लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती)