Thursday, June 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Mahadev Jankar : महादेव जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी; “या” मतदारसंघातून लढणार!

Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि आमदार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना महाविकास आघाडीने माढा लोकसभेची जागा दिल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी मनधरणी करत त्यांना एक जागा देऊन महायुतीमध्ये परत आणले होते. आता महादेव जानकर हे महायुतीमधून परभणी लोकसभा मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

---Advertisement---

खरंतर, जानकर हे महायुती आणि महाआघाडी अशा दोन्हींकडे लोकसभा लढविण्यासाठी आशा लावून बसले होते. माढा येथून महायुतीने आपला उमेदवारी जाहीर केल्याने आणि महाविकास आघाडी परभणी द्यायला तयार नसल्याने त्यांची अडचण झाली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना देखील भेटले असताना अचानक महायुतीने त्यांना आपल्याकडे ओढले.

जानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणीची जागा सोडण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. त्यामुळे आता परभणी लोकसभेसाठी महादेव जानकर हे मैदानात उतणार आहेत. त्यांचा सामना शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांच्याशी होणार आहे.

---Advertisement---

…आपण महायुतीचा आभारी – महादेव जानकर

आपल्या छोट्या पक्षाला सामावून घेतले आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानले होते. मी महायुतीला दोन जागा मागितल्या होत्या त्यातील त्यांनी एक दिली. त्यामुळे पन्नास टक्के भागीदारी दिल्याबद्दल आपण महायुतीचे आभारी असल्याचे महादेव जानकर म्हणाले.

राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा

राष्ट्रवादीने महायुतीकडे सहा ते सात जागा मागितल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. सुनील तटकरे हे स्वतः रायगडमधून रिंगणात असणार आहेत. बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची उमेदवार निश्चित आहे, तर शिरूरमधून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा

मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी बनला बोगस पोलिस, पुढे काय झाले वाचा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

ब्रेकिंग : आंबेडकर कुटूंबातील मोठा चेहरा अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात लढणार

बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित; राजद, कॉंग्रेस, डाव्यांना “इतक्या” जागा

ब्रेकिंग : बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार लढत ; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून उमेदवारी जाहीर

ब्रेकिंग : व्हाट्सॲपवर निवडणूकीचा प्रचार करणाऱ्यावर मोठी कारवाई

---Advertisement---

मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!

मध्यरात्री शेकडो विद्यार्थिनींचे कुलगुरूंच्या बंगल्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles