Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याAmol Kolhe : उमेदवारी जाहीर होताच डॉ.अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Amol Kolhe : उमेदवारी जाहीर होताच डॉ.अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Amol Kolhe : राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आज (दि.30 मार्च) रोजी लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर कोल्हे यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. ‌NCP Sharad Pawar Group Candidate List

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि आमच्या लोकसभेतल्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांचा मनापासून मी आभार मानतो. त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचे सुद्धा आभार मानतो. कारण 2019 मध्ये माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यानंतर गेली पाच वर्षाच्या सातत्याने लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न मांडत राहिलो. ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करू शकलो मला वाटतं की हा पुन्हा पवार साहेबांनी जो विश्वास माझ्यावर ठेवलाय हा विश्वास सार्थ करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. LokSabha Elections 2024

अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशीच लढत…

शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हे यांची पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सोबत लढत होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.

पाच उमेदवारांची जयंत पाटलांकडून घोषणा

शरद पवार गटाकडून आज (दि.30 मार्च) रोजी लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये वर्ध्यात नुकतेच काँग्रेसमधून शरद पवार गटात आलेले अमर काळे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून डॉ.अमोल कोल्हे, दिंडोरीमधून भास्करराव भगरे, तसेच नगर दक्षिणमधून अजित पवार गटातून आलेले निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा

मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी बनला बोगस पोलिस, पुढे काय झाले वाचा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

ब्रेकिंग : आंबेडकर कुटूंबातील मोठा चेहरा अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात लढणार

बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित; राजद, कॉंग्रेस, डाव्यांना “इतक्या” जागा

ब्रेकिंग : बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार लढत ; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून उमेदवारी जाहीर

ब्रेकिंग : व्हाट्सॲपवर निवडणूकीचा प्रचार करणाऱ्यावर मोठी कारवाई

मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!

मध्यरात्री शेकडो विद्यार्थिनींचे कुलगुरूंच्या बंगल्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध

संबंधित लेख

लोकप्रिय