Wednesday, May 22, 2024
Homeताज्या बातम्याAmbadas Danve : भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे...

Ambadas Danve : भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान

Ambadas Danve : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) लोकसभेच्या तिकिटावरून वाद सुरू होता. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना तिकीट जाहीर झाल्याने अंबादास दानवे नाराज झाले होते. त्यामुळे दानवे हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांवर अंबादास दानवे यांनी आज स्पष्टीकरण दिले.

अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजप प्रवेशाच्या सर्व चर्चा नाकारल्या. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत हा खुलासा केला. दानवे म्हणाले की, मी लढणारा शिवसैनिक आहे. माझ्याविरोधत सातत्याने खोट्या बातम्या पसरविण्यात येत आहे, मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. हा सगळा प्रकार भाजपकडून करण्यात येत असल्याचीही टीका दानवे यांनी केली. मी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचं ते म्हणाले.

चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात प्रचार

चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाने तिकिट दिलं आहे. तिकिट दोन – तीन जणांनी मागितलं म्हणजे मतभेद होत नाही. असं म्हणत त्यांनी ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात प्रचार करणार असल्याचे दानवे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचे हात मजबूत करण्यासाठी मी शिवसेनेतच लढणार आहे. खैरे आणि माझ्यात वाद नाही. ८ दिवसात संभाजीनगरचा प्रचार करणार आहे. नाराज असल्यावर पक्ष सोडतात का? असा प्रश्नही दानवे यांनी विचारला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा

मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी बनला बोगस पोलिस, पुढे काय झाले वाचा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

ब्रेकिंग : आंबेडकर कुटूंबातील मोठा चेहरा अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात लढणार

बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित; राजद, कॉंग्रेस, डाव्यांना “इतक्या” जागा

ब्रेकिंग : बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार लढत ; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून उमेदवारी जाहीर

ब्रेकिंग : व्हाट्सॲपवर निवडणूकीचा प्रचार करणाऱ्यावर मोठी कारवाई

मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!

मध्यरात्री शेकडो विद्यार्थिनींचे कुलगुरूंच्या बंगल्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय