Junnar/ आनंद कांबळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल येथे सदिच्छा समारंभाच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुन्नरचे (Junnar) न्यायाधीश व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रतापराव सपकाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शालेय व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने स्वागत सत्कार करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
शाळेस पुणे येथील संस्थेच्या माध्यमातून इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम यांच्या अध्यक्षा स्नेहल चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या सदस्या मंजू गांधी यांच्या दातृत्वातून शाळेसाठी कुलर वॉटर भेट व समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शालेय ऑफिस सोफा सेट व रंगीत प्रिंटर प्राप्त आणि शालेय उद्घाटन सपकाळ याच्या शुभहस्ते करण्यात आले. (Junnar)
यावेळी सपकाळ म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये जे वास्तव आहे त्या परिस्थितीशी जुळून आपण आपलं कार्य आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जीवन जगले पाहिजे. बुद्धिमत्तेच्या बाबतीत जरी आदिवासी व पश्चिम भाग आणि पूर्व भाग असा कोणताही भेदभाव नसून आपल्या अंगी असणाऱ्या बुद्धीमत्तेच्या जोरावर कर्तुत्वाचा ठसा आपण निर्माण केला पाहिजे आणि म्हणूनच मी देखील एक ग्रामीण भागातील विद्यार्थी असून घरची परिस्थिती तुमच्या सारखीच सर्वसामान्य असून आज मी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मी जरी उंच भरारी घेतली असली तरी आपण देखील भविष्यामध्ये माझ्यापेक्षाही अशीच उंच भरारी घ्याल अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करून विविध वास्तववादी उदाहरणे देऊन विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांना अनमोल प्रेरणा मिळेल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मला येण्याचे भाग्य लाभले आणि माझ्या बालपणातील माझ्या विद्यार्थी जीवनाच्या आठवणींना उजाळा मिळाला याबद्दल संयोजकाना धन्यवाद दिले तर शालेय पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन ज्येष्ठ पत्रकार व मा.मुख्याध्यापक प्राचार्य सबनीस विद्यालय जुन्नर चे आनंदा कांबळे, जुन्नर पर्यटनचे तालुकाध्यक्ष यश मस्करे, आपटाळे केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश भवारी, उच्छिल केंद्राच्या केंद्रप्रमुख पुष्पलता पानसरे व खिरेश्वर शासकिय आश्रम शाळेचे उपशिक्षक अशोक खाडे उपस्थित होते. (Junnar)
प्रथमता इयत्ता पहिलीच्या मुलांचा स्वागत उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन करण्यात आले तर इयत्ता सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सदिच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इयत्ता सातवी मध्ये आदर्श विद्यार्थी ओम बाळू नवले व आदर्श विद्यार्थिनी अक्षरा निलेश नवले या दोन विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेच्या वतीने शैक्षणिक भेटवस्तू देऊन त्यांना गौरविण्यात आले तसेच गेले पंधरा वर्षे शालेय पोषण आहार मदतनीस म्हणून अतिशय छान काम केलेले श्रीमंत साबळे यांचाही शिक्षकांच्या वतीने येथे सन्मान करण्यात आला त्यांच्या जागी हिराबाई जयराम नवले यांचे स्वागत करण्यात आले.
मनोगतात मुलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आमच्या शालेय जीवनातील इयत्ता पहिलीतील प्रसंग व सात वर्षात शाळेमध्ये मिळालेले ज्ञान आलेले अनुभव याबाबत मनोगत व्यक्त केले यामध्ये सलोनी केंगले अक्षरा नवले श्रुती भालेराव कोमल भालेराव मयुरी बोऱ्हाडे व सुप्रिया बांबळे या विद्यार्थिनींनी खूप सुंदर हृदयस्पर्शी असं मनोगते या निमित्ताने व्यक्त केले तर विद्यार्थ्यांना शुभेच्छा व सदिच्छा देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल आंबोली विद्यालयाच्या वतीने सर्व सातवीच्या मुलांना शालेय दप्तर देऊन त्यांना सदिच्छा समारंभाच्या निमित्ताने भेट देण्यात आली व त्यांना शुभेच्छा विद्यालयाचे साहित्य प्रमेय शिक्षक बाळासाहेब जाधव यांनी दिल्या. तसेच अशोक खाडे , पत्रकार आनंदा कांबळे व यश मस्करे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय समितीचे अध्यक्ष सचिन नवले, उपाध्यक्ष सागर बगाड, ग्रामपंचायतचे सदस्य दशरथ नवले, उच्छिल विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक बापू नवले, लक्ष्मण बगाड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सविता आढारी, वर्षा नवले, कांचन नवले, समिती उपाध्यक्ष गणपत भालेराव, सदस्य संपत नवले, पालक सदस्य शिवाजी नवले, सुधीर नवले, मोहन नवले, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक किसन नवले, चंद्रकांत शिंदे, शांताबाई नवले, रवींद्र भालेराव तसेच केंद्रातील शिक्षकांच्या वतीने मीनाक्षी चौधरी, शोभा उंडे उपस्थित होत्या.
तसेच गावातील तरुण मंडळ, पालक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला शुभेच्छा जुन्नरचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, अनिता शिंदे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी संचिता अभंग, दत्तात्रय भारमळ शालेय पोषण आहार अधीक्षक, मनोज तापकीर उप अभियंता समग्र शिक्षा अभियान यांनी दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद यांनी केले तर संयोजन व नियोजन स्मिता ढोबळे, आरती मोहरे, लीलावती नांगरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे पदवीधर शिक्षक सुभाष मोहरे यांनी केले.
हे ही वाचा :
Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल
मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक
अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका
वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला
ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !
…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र
मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार
धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून
मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान
ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन
ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !