Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाकामगार उपायुक्तालयातील दुकाने निरिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

कामगार उपायुक्तालयातील दुकाने निरिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

नाशिक : हॉटेलमध्ये बालकामगार नसल्याचा अहवाल देत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात हॉटेल चालकाकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना कामगार उपायुक्त कार्यालयातील महिला निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.१५) रंगेहाथ पकडले. निशा बाळासाहेब आढाव (दुकाने निरिक्षक, कामगार उपायुक्त कार्यालय, उद्योग भवन नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, एका हॉटेल व्यवसायिक शहरात चालवीत असलेल्या हॉटेलमध्ये बालकामगार नोकरीस असल्याची बतावणी करून या प्रकरणात आढाव यांनी केलेल्या तपासणी दरम्यान नीरंक अहवाल पाठवून बाल कामगार असल्यासंदर्भात गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात हॉटेल व्यावसायिकाकडे लाचलुचपक प्रतिंबधक विभागाच्या पंचासमक्ष ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून कामगार उपायुक्त कार्यालयात लाच स्विकारताना एसीबीने सापळा रचून पकडले.

सदर कारवाई सापळा अधिकारी पोलिस उपअधिक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पथक पोलिस नाईक मनोज पाटील, अजय गरुड, शितल सूर्यवंशी यांनी रंगेहाथ पकडले असून सायंकाळी उशीरापर्यंत या प्रकरणात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हे ही वाचा :

प्रवासी वाहतुक करू देण्यासाठी हप्ता घेणारा वाहतूक पोलीस लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

भीषण : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकची ट्रॉलीला धडक ; चुलता – पुतणे जागीच ठार

BIPARJOY व्हिडीओ न्यूज : चक्रीवादळाचा गुजरातमध्ये धुमाकूळ

व्हायरल व्हिडिओ : ‘आ रे प्रीतम प्यारे’वर पठ्ठ्याचा भर बाजारात डान्स; मुली लाजल्या, महिला पाहतंच राहिल्या

मोठी बातमी : अल्पवयीन महिला कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंग यांना क्लीन चिट, “हे” चार्जेस हटवले

शिंदेंच्या जाहिरातीवरून भाजप नेत्यांनी मागितली “ही” माहिती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय