Monday, May 20, 2024
Homeजिल्हाअपंगत्वाचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी मागितली लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी मागितली लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

परभणी : परभणी येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टरची ओळख असल्याचे सांगून अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी 3 हजार रूपयाची लाच घेतल्यानंतर आणखी पैशांची मागणी करून 2 हजार रूपयाची लाच घेताना एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्याच्याविरूध्द नानलपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

विष्णू बापूराव कोरडे (वय. 32, व्यवसाय – खाजगी नोकरी, रा. ठाकरे नगर, परभणी, जि. परभणी) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, विष्णु कोरडेने तक्रारदारास त्याची परभणी येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टरची ओळख असल्याचे सांगितले. तक्रारदारास अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढून देण्याकरिता कोरडेने यापुर्वीच 3 हजार रूपये घेतले. त्यानंतर देखील त्याने 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दि. 14 जून 2023 रोजी विष्णु कोरडेने सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून 2 हजार रूपये लाच म्हणून घेतले आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आणखी 5 हजार रूपये द्यावे लागतील असे सांगितले. दरम्यान, एसीबीच्या पथकाने विष्णु कोरडेला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उप अधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे, पोलिस अंमलदार मिलिंद हनुमंते, चंद्रशेखर निलपत्रेवार, शेख जिब्राईल, राम घुले, पोलिस हवालदार चालक कदम यांच्या पथकाने केली आहे.

हे ही वाचा :

प्रवासी वाहतुक करू देण्यासाठी हप्ता घेणारा वाहतूक पोलीस लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

भीषण : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकची ट्रॉलीला धडक ; चुलता – पुतणे जागीच ठार

BIPARJOY व्हिडीओ न्यूज : चक्रीवादळाचा गुजरातमध्ये धुमाकूळ

व्हायरल व्हिडिओ : ‘आ रे प्रीतम प्यारे’वर पठ्ठ्याचा भर बाजारात डान्स; मुली लाजल्या, महिला पाहतंच राहिल्या

मोठी बातमी : अल्पवयीन महिला कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंग यांना क्लीन चिट, “हे” चार्जेस हटवले

शिंदेंच्या जाहिरातीवरून भाजप नेत्यांनी मागितली “ही” माहिती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय