Saturday, May 18, 2024
HomeहवामानBIPARJOY व्हिडीओ न्यूज : चक्रीवादळाचा गुजरातमध्ये धुमाकूळ

BIPARJOY व्हिडीओ न्यूज : चक्रीवादळाचा गुजरातमध्ये धुमाकूळ

जामनगर : बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरात मध्ये धुमाकुळ सुरू असून वादळ किनारपट्टीवर धडकले आहे. सौराष्ट्र,गांधीधाम आणि कच्छ समुद्र किनाऱ्यावर बिपरजॉयचमूळे मोठं मोठे वृक्ष कोसळले आहेत. अनेक ठिकाणी भुसखलन सुरू झाले आहे. गुजरातमधील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. चक्रीवादळ किनारपट्टीवर विध्वंस करत असून १०० ते १३० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू लागले आहेत.



किनारपट्टीवरील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे, जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दल (एसडीआरएफ) याबरोबरच लष्कर, हवाई दल, नाविक दल आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहेत. या दरम्यान ताशी ८० ते १२० च्या वेगाने वारे वाहू लागले आहेत. किनारपट्टीवर आठ जिल्ह्यातील जवळपास ९४, ००० हून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

गुजरात सरकारने एनडीआरएफची १५ पथके तसेच एसडीआरएफची १२ पथके मदत व बचाव कार्यासाठी तैनात केली आहेत. कमांडर कोस्ट गार्ड क्षेत्र-उत्तर पश्चिमचे महानिरीक्षक एके हरबोला म्हणाले – आम्ही गुजरातमध्ये १५ जहाजे आणि ७ विमाने तयार ठेवली आहेत. एनडीआरएफच्या २७ तुकड्याही तैनात आहेत. जामनगर, मोरबी, राजकोट, द्वारका, जुनागढ, पोरबंदर, गिर सोमनाथ या जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारने १ लाख लोकांना सुरक्षित छावण्यात हळवण्यास सुरवात केली आहे.

विशेष लेख : असंघटित कष्टकरी, कंत्राटी कामगारांची ‘गधा मजदूरी’ म्हणजे मालकवर्गाचे नफ्याचे अर्थशास्त्र


आळंदीत मोफत आरोग्य तपासणी औषध वाटप

भोसरीतील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला मुदतवाढ, पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांचे आवाहन

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय