Tuesday, March 25, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आळंदीत मोफत आरोग्य तपासणी औषध वाटप

आळंदी / अर्जुन मेदनकर: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या अंतर्गत आषाढी वारी निमित्त अविरत आमुची पाऊले चालती, जनसेवेची ध्येयपूर्ती या उक्ती प्रमाणे आळंदीत आलेल्या वारकरी बांधवांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी शहराच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप उत्साहात करण्यात आले आहे.

या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी या आरोग्य सेवेस प्रतिसाद देत लाभ घेतला आहे. या प्रसंगी सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. उपक्रमाचे संयोजन आळंदी शहर मनसे शहराध्यक्ष अजय उर्फ ज्ञानेश्वर सुरेश तापकीर यांनी केले. वारकरी भाविकांचा आरोग्याची काळजी घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे शहराध्यक्ष अजय तापकीर यांनी सांगितले.

आजोळघरी माऊलींचे पालखी सोहळ्याचा पाहुणचार ; हरिनाम गजरात श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीकडे


पालखी मार्गावर व्यापक स्वच्छता अभियान


PCMC-व्हिडीओ न्यूज : अक्षय भालेराव, गिरीधारी तपघाले हत्येचा निषेधार्थ विराट मोर्चा

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles