Vadavani : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देवडी येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया वडवणी (Vadavani) तालुका कमिटीच्या वतीने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. महामानावांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी एसएफआय सतत प्रयत्नशील आहे. महामानवांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या विचारांचा जागर करणे, त्यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवणारी एसएफआय महामानवाच्या व क्रांतिकारकांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारी विद्यार्थी संघटना आहे.
या अभिवादन सभेला बीड जिल्हा सचिव विष्णु गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना गवळी म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत व मुलींना व महिलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी सबंध आयुष पणाला लावले. समाजातील अनिष्ट रुढी परंपरा विरुद्ध बंड पुकारले व समाज प्रबोधनाचे महान कार्य केले.
यावेळी अभिवादन सभेला तालुका उपाध्यक्ष करण भिसे, राहुल वैरागे, महेश अडागळे, कार्तिक गवळी, रोहित गालफाडे, आकाश गायकवाड, ज्ञानेश्वर मुजमुले, समाधान पोटभरे, नितीन पोटभरे, करण लोंढे, माऊली भिसे, आदित्य अडागळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या अभिवादन सभेचे सूत्रसंचलन एसएफआयचे वडवणी तालुका उपाध्यक्ष करण भिसे यांनी केले.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !
मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर
प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल
जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या
ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू
माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत
हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना
मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !