Saturday, April 27, 2024
Homeराजकारणकर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

बंगळुरु : कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. (Karnataka Elections Result) कर्नाटकात 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान (Voting) झाले. एकूण 73.19 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

कर्नाटकातील 2018 च्या विधानसभा निवडणुकांपेक्षा मतदानाचा टक्का 1 टक्क्यांनी वाढलेला आहे. येथे भाजपाची व काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली होती, अखेर या निकालातून काँग्रेस वरचढ दिसत आहे. आतापर्यत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस 136, भाजपा 64 तर जेडीएस 20 तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळं आाता काँग्रेसमधून मुख्यमंत्री कोण होणार, यावर चर्चा रंगत आहे.

याबाबत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजपकडून स्वायत्त संस्थाचा राजकारणासाठी होणारा वापर हा भविष्यातील लोकशाही मोडून काढण्याचा प्रयत्न भाजपचा दिसत आहे. हे सर्व थांबवून देशातील सर्वांना बरोबर घेऊन लोकशाही वाचवायची असेल तर इथून पुढील काळात भाजपचा पराभव करणे गरजेचे आहे. देशातील धोक्यात आलेली लोकशाही वाचविण्याचा काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी व सोनिया गांधी करत आहे त्याला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचे कर्नाटकच्या निवडणुक निकालावरून दिसून आले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रतिसाद कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत मिळाला आहे का असे विचारले असता आ. थोरात म्हणाले की, ‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरली आहे. या यात्रेच्या माध्यमातून लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी केलेला हा फार मोठा प्रयत्न आहे. त्या भारत जोडो यात्रेचा परिणाम कर्नाटकच्या निवडणुकीवर झाला असल्याचे आज जाहीर झालेल्या निकालावरून दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा :

कर्नाटकात भाजप की काँग्रेस ? ‘जेडीए’ किंगमेकर ठरणार

कर्नाटक निवडणूक निकाल : काँग्रेस आघाडीवर तर भाजप पिछाडीवर; तर बेळगावात…

जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध करत माकप कडून कडवी टिका

बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत मोठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय