Friday, May 3, 2024
Homeराजकारणकर्नाटकात भाजप की काँग्रेस ? 'जेडीए' किंगमेकर ठरणार

कर्नाटकात भाजप की काँग्रेस ? ‘जेडीए’ किंगमेकर ठरणार

Karnataka Election 2023 Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. 224 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. तर ‘जेडीए’ किंगमेकर ठरणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

सध्या कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. ज्याचे नेतृत्व बसवराज बोम्मई करत आहेत. पण या निवडणुकीच्या निकालानंतर कर्नाटकची सत्ता कोणाच्या हाती जाणार हे आज समोर येणार आहे. थोड्याच वेळात कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येतील.

भाजप च्या ‘मिशन 2024’ ला धक्का ?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आज येतील. मात्र, त्याआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची (भाजप) चिंता वाढवली आहे. एक्झिट पोलच्या निकालात भाजपचा पराभव आणि काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बहुतांशी एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 110 ते 140 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यादृष्टीने कर्नाटक निवडणुकीला मोठं महत्त्व आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय