Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याPune: पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा; गर्दी जमविण्याचे आवाहन

Pune: पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा; गर्दी जमविण्याचे आवाहन

Pune: जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघांतील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या सोमवारी (दि. 29) पुण्यात जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या सभेला मोठी गर्दी जमविण्याच्या तयारीला महायुतीतील सर्व पक्ष लागले आहेत. (pune)

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून लोक सभास्थानी आणण्याची जबाबदारी भाजप आणि महायुतीतील पदाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार तसेच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) या पक्षांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी तसेच चारही मतदारसंघांतील प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक शुक्रवारी (दि.26) झाली.

मोदींच्या सभेचे नियोजन, कोणत्या भागातून किती कार्यकर्ते आणि नागरिक जाहीर सभेला येणार, याचा आढावा घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने गर्दी जमविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

MAHAJOB

चंद्रकांत पाटील म्हणाले, “आजपर्यंत अशी सभा झाली नाही अशी भव्य सभा करण्यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. पंतप्रधान मोदी हे कराडमधील सभा संपवून पुण्याला सोमवारी येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्यासोबत येतील. मोदी यांचा त्या दिवशी पुण्यातील राजभवनात मुक्काम असेल. रोड शोसंदर्भात अद्याप काही ठरलेले नाही.

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, पुण्यातून जास्तीत जास्त नागरिक रेसकोर्स मैदानावरील सभेला उपस्थित राहतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. पुण्यात भाजपचे १०० नगरसेवक, ५ आमदार, संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यांच्यावर नागरिक आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुणे शहरातून ५० हजारांपेक्षा अधिक नागरिक सभेला येतील. त्याव्यतिरिक्त अन्य मतदारसंघांतून नागरिक येतील.

ग्रामीण भागातून नागरिक आणण्याचे नियोजन

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या दृष्टीने मोदी यांची जाहीर सभा ही महत्त्वाची बाब ठरणार आहे. शिरूर मतदारसंघातील हडपसर विधानसभा मतदारसंघात ही सभा होत आहे. बारामती मतदारसंघातील पुरंदर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ हेही जवळच आहेत. शिरूर आणि बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार आहेत. त्यांच्याही प्रचारासाठी पंतप्रधान येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक सभेसाठी आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ

ब्रेकिंग : राज्यातील “या” भागात ३ दिवस उष्णतेची लाट तर “या” भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मोठी बातमी : नवनीत राणांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

ब्रेकिंग : शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद!

नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना वाटले ३०० रूपये ? मध्यस्थाने घेतले ७०० रूपये, व्हिडिओ व्हायरल

मोठी बातमी : भाजप उमेदवाराकडून 4.8 कोटींची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

मोठी बातमी : WhatsApp ची भारतातून सेवा बंद करण्याची धमकी

बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!

ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला

मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय