Sunday, April 28, 2024
Homeराजकारणजयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध करत माकप कडून कडवी टिका

जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध करत माकप कडून कडवी टिका

मुंबई : अगतिक झालेल्या भाजपने महाराष्ट्रात सूडसत्र सुरू केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावरील ईडी कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या कारवाईचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तीव्र निषेध करत आहे, अशी माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केली आहे.

माकपने म्हटले आहे की, शिंदे-फडणवीस सरकार आता लोकांच्या इच्छेनुसार चालत नसून ईडीच्या काडीच्या आधारावर तगून राहण्याचा कसाबसा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा डाव शरद पवारांनी उधळून लावला. मागोमाग सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने शिंदे-फडणविसांची नैतिक लक्तरे वेशीवर टांगली. ती लक्तरे डोक्याला गुंडाळूनच राज्य सरकारचा कारभार केला जाणार आहे, असा संदेशच ईडीच्या या बेकायदेशीर कृत्याने दिला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार हे ईडी सरकार असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे.

भाजपप्रणित या ईडी सरकारच्या भ्याड कृत्याचा राज्यातील सर्व लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष जनतेने प्रखर विरोध करावा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केले आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, वाचा काय आहे प्रकरण

पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सर्पदंश झाल्यास नागरिकांना वेळेत औषधोपचार घेण्याचे डॉ. सदानंद राऊत यांचे आवाहन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय