Sunday, May 12, 2024
Homeजुन्नरश्रीक्षेत्र ओझर येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन

श्रीक्षेत्र ओझर येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन

जुन्नर / राजेंद्रकुमार शेळके : श्री क्षेत्र ओझर येथे आज (दिनांक १०) भव्य सामुहिक विवाह सोहळा मोठया थाटामाटात संपन्न झाला असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली. सदर दिवशी १७ जोडपी विवाहबद्ध झाली.

ह. भ. प. विकास महाराज हगवणे, माजी अध्यक्ष मुरलीधर घेगडे, माजी उपाध्यक्ष रघुनाथ मांडे, माजी सरपंच ओझर जगन्नाथ कवडे, अध्यक्ष मंगलमूर्ती पतसंस्था प्रकाश मांडे, माजी उपाध्यक्ष सुर्यकांत रवळे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप कवडे, दत्तात्रय कवडे, माजी उपसरपंच सुरेश टेभेंकर, ग्रामविकास अध्यक्ष संतोष मांडे, महेश कवडे, सामाजिक कार्यकर्ते, रघुनाथ कवडे, दत्तात्रय ठुबे, माजी खजिनदार किसन मांडे, माजी विश्वस्त चिंतामण कवडे या मान्यवरांच्या शुभहस्ते गणेश पुजन झाले. या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी स्टेज व्यवस्तेवर फुलांची सजावट केली होती. तसेच अष्टविनायक दर्शन देखावा आरस करण्यात आली होती.

सुपारी फोडणे, साखरपुडा व टिळ्याचा मॉडेल असा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये साखरपुड्याच्या व टीळ्याच्या कार्यक्रमच्या शेवटी वधूवरांना स्त्रीभ्रूणहत्या करणार नाही व करून देणार नाही अशी शपथ देण्यात आली.

वधुवारांकडून अत्याल्प रक्कम अकारून घेतलेल्या रकमेतून वऱ्हाडी मंडळींसाठी जेवण, वधू वरांसाठी हार, गुच्छ, बाशिंगे, कळसतांब्या, हळद साहित्य, मामांचे फेटे, सुवासिनिचा सत्कार, नवरदेवांचे टोप, सुपारी फोडणाऱ्या व टिळा लावणाऱ्या मान्यवरांसाठी टोपी, टावेल, अक्षदा, कन्यादान विधी इत्यादी सुविधा पुरविण्यात आल्या असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली.

याप्रसंगी ह.भ.प.पंकज महाराज गावडे, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार संग्राम जगताप, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, वि.स.सा.कारखाना चेअरमन सत्यशील शेरकर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती माऊली खंडागळे, माजी अध्यक्ष शाकुजी कवडे, विश्वस्त मंगेश मांडे यांनी वधूवरांना शुभ आशिर्वाद दिले.

उपस्थिती मान्यवर पाहुण्यांचे आभार मानत असताना सामूहिक विवाह एक चळवळ असून त्यास धार्मिक अधिष्टान ट्रस्ट देत असल्याचे देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे यांनी सांगितले. विवाह सोहळ्यामध्ये उपाध्यक्ष अजित कवडे, सचिव दशरथ मांडे, खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त बी. व्ही.अण्णा मांडे, रंगनाथ रवळे, आनंदराव मांडे, किशोर कवडे, मंगेश मांडे, गणपत कवडे, कैलास मांडे, विजय घेगडे, राजश्री कवडे उपस्थित होते.

शुभमुहूर्तावर मंगलाष्टके गायन करून विवाह सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विश्वस्त मंगेश मांडे, कैलास मांडे यांनी केले, सूत्रसंचालन माजी सरपंच जगन्नाथ कवडे यांनी केले. सामुहिक विवाह सोहळ्याचे नियोजन देवस्थान ट्रस्ट चे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले.

हे ही वाचा :

जुन्नर : बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणी एकास अटक तर २० जणांवर गुन्हा दाखल

जुन्नरच्या पेशवेकालीन शाहीर समाधी मंदिरातील “पदचिन्ह” दुर्लक्षित

जुन्नर : बेलसर ते भिवाडे दरम्यानचा रस्ता खड्डेमय; धुळ व खडीचा वाहनचालकांना त्रास

कादरीया वेलफेअर सोसायटी तर्फे सामुदायिक विवाह संपन्न

धक्कादायक : शौचालयाचा टँक साफ करताना एकाच घरातील पाच कामगारांचा गुदमुरून मृत्यू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय