Friday, May 10, 2024
Homeराजकारण‘आतापर्यंत तु 4 वाजल्यानंतर माझ्याविरुध्द बोलत होतीस; आता बहुतेक… ; जितेंद्र आव्हाडांचे...

‘आतापर्यंत तु 4 वाजल्यानंतर माझ्याविरुध्द बोलत होतीस; आता बहुतेक… ; जितेंद्र आव्हाडांचे ते ट्विट चर्चेत

मुंबई : केरळमधील कम्युनिस्ट पक्षाच्या मंत्री के. के. शैलजा यांचे कोविड काळातील काम संपूर्ण जगामध्ये गाजले. त्यांनी एक पुस्तक लिहीले आहे ‘कॉम्रेड म्हणून माझे आयुष्य’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ व पुस्तकातील एक पान ट्विट केले आहे. त्याला अनेकांनी रि-ट्विट करत अनेकांनी आजचे राजकारण द्वेषाचे असल्याचाही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये लिहितात, “त्यामध्ये त्यांनी लिहीले आहे की, मी शिक्षक म्हणून काम करीत होते. मला कम्युनिस्ट पक्षाने आता पूर्ण वेळ पक्षासाठी द्यावा असे आदेश दिले. पण, शिक्षक असल्याकारणाने मला तसे करता येणे शक्य नव्हते. म्हणून केरळचे तत्कालिन मुख्यमंत्री मुख्यमंत्री ए. के. अँथनी यांना जाऊन विनंती केली. विरोधी पक्षात असून देखिल मला त्यांनी सहकार्य करुन मदत करण्याचे आदेश दिले. आणि ते म्हणाले की, ‘आतापर्यंत तु 4 वाजल्यानंतर माझ्याविरुध्द बोलत होतीस; आता बहुतेक संपूर्ण दिवस तु माझ्याविरुद्ध बोलणार.’

भारतीय राजकारणातील हे सुवर्ण दिवस आता अस्तित्वात आहेत की नाही याबद्दल शंका आहे. हिच भारताची खरी ओळख होती आणि तीच आपण पुसतं आहो.”

हे ही वाचा :

कर्नाटकात भाजप की काँग्रेस ? ‘जेडीए’ किंगमेकर ठरणार

कर्नाटक निवडणूक निकाल : काँग्रेस आघाडीवर तर भाजप पिछाडीवर; तर बेळगावात…

जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध करत माकप कडून कडवी टिका

बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत मोठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय