Friday, May 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : चिंचवड गावातून सर्वाधिक मतांनी मावळ मध्ये महायुती विजयी होणार

PCMC : चिंचवड गावातून सर्वाधिक मतांनी मावळ मध्ये महायुती विजयी होणार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मावळ मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांच्या प्रचारार्थ नमो संवाद कॉर्नर सभा चिंचवड विधानसभा मतदार संघात सुरू झाल्या आहेत. PCMC

महायुती मधील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय, मनसे, रासप व इतर मित्र पक्षांचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार खा.श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज आज प्रभाग १८ चिंचवडगावात ‘नमो संवाद’ कॅार्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. PCMC

देशाचे कर्तृत्ववान व लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेली कामे, योजना व प्रकल्प यांची माहिती जनतेला व्हावी याकरिता संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नमो संवाद कॅार्नर सभांचे आयोजन केले जात आहे.

चिंचवडगावातील वेताळनगर शिवसेना शाखा, महात्मा फुले उर्दू शाळा, श्रीमन् महासाधू मोरया गोसावी क्रिडागंण केशवनगर व काकडे पार्क गणेश मंदिर या ठिकाणी ‘नमो संवाद कॅार्नर सभा’ मोठ्या उत्साहात पार पडल्या.


यावेळी प्रमुख वक्त्या म्हणुन भाजपा पिंपरी चिंचवड शहर प्रभारी ॲड. वर्षा डहाळे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. pcmc news

या सर्व नमो संवाद कॅार्नर सभा यशस्वी करण्यासाठी प्रभाग क्रमांक १८ चिंचवड मधील भाजपा प्रदेश सदस्य व माजी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, भाजयुमोचे प्रदेश सचिव अजित कुलथे, मधुकर बच्चे, योगेश चिंचवडे, धनंजय शाळिग्राम, रविंद्र देशपांडे, उज्वला गावडे, नूतन चव्हाण, रविंद्र प्रभुणे, संतोष निंबाळकर, प्रशांत आगज्ञान, पल्लवी पाठक, दिपाली कलापूरे यांचेसह भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी यांचे सरकार केंद्रात येणार, महायुती विजयी होणार, चिंचवडगावातून सर्वाधिक मतदान श्रीरंग बारणे यांना मिळणार असा निर्धार व्यक्त केला आहे.

या नमो संवाद सभेत महायुतीच्या घटक पक्षातील शिवसेना विद्यार्थी सेनेचे प्रदेश पदाधिकारी विश्वजीत बारणे, मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, शिवसेना उपशहर प्रमुख राजेश आरसूळ, मनसे चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे यांनी देखिल उपस्थितांशी संवाद साधला.

या सर्व नमो संवाद कॅार्नर सभांना चिंचवडकर नागरिक उस्फुर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : येत्या 24 तासात वादळी वाऱ्यासह महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी

ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार

मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय