Friday, May 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : थेरगाव, रहाटणीत नमो संवाद सभेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

PCMC : थेरगाव, रहाटणीत नमो संवाद सभेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशभरात रस्ते-महामार्ग तसेच शिक्षण, आरोग्य व अन्य क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे. PCMC

केंद्र सरकारच्या विविध योजना थेट लाभार्थ्यापर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवल्या गेल्या. देशाच्या इतिहासात प्रथमच जनतेला अनेक सरकारी सुविधांचा लाभ प्रत्यक्ष मिळाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सुज्ञ जनतेने यावेळीही सर्वांगिण विकासाचा विश्वास देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणजेच महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांना विजयी करावे, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. PCMC NEWS

मावळ लोकसभा मतदारसंघातील (maval loksabha 2024) शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालय तसेच रहाटणी येथील नखाते वस्ती येथे नमो संवाद सभा पार पडली.


यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करतांना भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप (shankar jagtap) बोलत होते.

यावेळी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, अभिषेक बारणे, हर्षल ढोरे, जयदीप माने, संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्र माने, मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, भाजयूमोचे सनी बारणे, कायदा सेल जिल्हा संयोजक ऍड. गोरक्षनाथ झोळ, नारायण मोरे, सामाजिक कार्यकर्त्या करिष्मा बारणे, पियुषा पाटील, शिवसेना युवती प्रमुख रितु कांबळे, रोहन बारणे, रवि भिलारे आदी उपस्थित होते.

मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक विकासाचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. देशाच्या विकासाने गेल्या १० वर्षांच्या काळात पकडलेली गती कायम राखण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुती विजयी होणे आवश्यक आहे, असेही जगताप म्हणाले.

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात देशाचे सर्वच क्षेत्रात भरारी घेतली आहे. देशाची महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरु आहे. pcmc news

मावळ लोकसभा मतदारसंघात भरघोस निधी मिळाल्याने मावळचा विकास पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. नमो संवाद सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रहाटणी मध्ये नमो संवाद सभा.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी येथे नमो संवाद सभा घेण्यात आली.

या सभेला महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते. मावळमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी आमदार आश्विनी जगताप, माजी नगरसेविका सविता खुळे, नरेश खुळे, मंडलाध्यक्ष संदिप नखाते, आयुष्यमान भारत योजना जिल्हा संयोजक गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते, नामदेव शिंत्रे, सुनिल नखाते, मनोज नखाते, गोपाळ कांबळे आदी उपस्थित होते. pcmc news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : येत्या 24 तासात वादळी वाऱ्यासह महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी

ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार

मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय