Tuesday, April 30, 2024
Homeआंतरराष्ट्रीयIran Israel : इराण आणि इस्रायलमध्ये प्रवास करू नका, भारत सरकारचा सल्ला

Iran Israel : इराण आणि इस्रायलमध्ये प्रवास करू नका, भारत सरकारचा सल्ला

एअर इंडियाच्या विमानांनी मार्ग बदलला Iran Israel

नवी दिल्ली : पॅलेस्टाईनमधील युद्ध अद्याप थांबलेले नाही आणि एक नवीन युद्ध सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलने दमास्कसमधील इराणच्या दूतावासावर हल्ला केला, ज्यात दोन इराणी जनरल ठार झाले.

ईराण आणि इस्रायलमधील (Iran Israel) तणाव वाढत असून या दोन देशात युद्ध होण्याची शक्यता वाढली आहे, सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावर गेल्या १ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराण कुठल्याही क्षणी इस्रायलवर हल्ला करु शकतो. 100 पेक्षा जास्त ड्रोन आणि मिसाइलने हा हल्ला होऊ शकतो. इराणकडून इस्रायलच्या शहरावर व सैन्य तळांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे, तशी धमकी इराणने जाहीर पणे दिली आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) निर्देश जारी केले आहेत की, पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय नागरिकांनी इराण, इस्रायल मध्ये प्रवास करू नये. असा सल्ला भारतीय नागरिकांना दिला आहे. जोपर्यंत पुढची नियमावली जारी केली जात नाहीत तोपर्यंत इराणला जाऊ नका, त्या देशाचा प्रवास टाळा असं परराष्ट्र खात्याने म्हटलं आहे.

इस्राएलमध्ये 18,000 भारतीय कामगार आहेत. यातील बहुतेक भारतीय आयटी क्षेत्रात आहेत किंवा अन्य क्षेत्रात कार्यरत आहेत. तर आणखी जवळपास 6,000 भारतीयांना पुढच्या महिन्यात पाठवले जाणार होते. मात्र, आता ते शक्य होईल असे वाटत नाही. इराणमध्ये जवळपास 5 हजार भारतीय आहेत. यातील बहुतेकजण व्यापारी आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.

दरम्यान एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी (१३ एप्रिल) एअर इंडियाच्या विमानांनी युरोपला जाणारी इराणच्या हवाई हद्दीतून उड्डाणे बंद केली आहेत. इस्त्रायलवरील संभाव्य इराणच्या हल्ल्यासंदर्भातील तणाव तीव्र होत आहे, इस्रायली सैन्याने आगामी हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले आणि अनेक आंतरराष्ट्रीय या दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊ शकते, असा इशारा दिला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय