Wednesday, May 1, 2024
Homeग्रामीणskateathon : बारामतीमध्ये पहिल्यांदाच पार पडले स्केटेथॉन

skateathon : बारामतीमध्ये पहिल्यांदाच पार पडले स्केटेथॉन

बारामती : बारामती मध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ग्रुपने मॅरेथॉन आयोजित केले आहे. पण कीप ऑन रोलीन स्केटिंग क्लबच्या वतीने पहिल्यांदाच बारामती मध्ये एक आगळेवेगळे स्केटेथॉन आयोजित केले गेले. सावळ रोडच्या पालखी महामार्गावर 12 एप्रिल रोजी सकाळी सहा ते दहा या वेळात हे स्केटेथॉन (skateathon) पार पडले. यामध्ये तीन वर्षापासून तेरा वर्षापर्यंतच्या जवळपास 100 मुलांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये बारामतीतील वेगवेगळ्या शाळांमधील ७० मुले व पुण्याहून आलेली ३० मुले सहभागी झाली होती.

८/१६/३२ किलोमीटर या तीन गटांमध्ये हे स्केटेथॉन (skateathon) पार पडले. स्किन सुट व त्यावर किप ऑन रोलीन स्केटिंग क्लब चा टी-शर्ट तसेच सगळे सेफ्टी गार्ड्स घालून सकाळी सहा वाजता शंभर स्केटर्स उत्साहात जमले होते. वॉर्मप करून ७:०० वाजता पहिला ग्रुप 32 किलोमीटर साठी निघाला. पंधरा मिनिटाच्या फरकाने १६ व ८ किलोमीटरचे ग्रुपही पायात स्केट्स घालून उत्साह मध्ये मार्गस्थ झाले.

कौतुकाचे बाब म्हणजे यामध्ये तीन वर्षाची पाच ते सहा मुले होती ज्यांनी आठ किलोमीटर हे आपले टार्गेट अगदी व्यवस्थित पूर्ण केले. या मुलांसाठी डीहायड्रेशन पॉईंट्स ठेवले गेले होते, जिथे पाणी फ्रुट्स याची सोय केली गेली होती. या मुलांना तिथेच नाष्टाही देण्यात आला. पालकांचा प्रचंड सपोर्ट व कीप ऑन रोलीन स्केटिंग क्लबचे प्रशिक्षक तनिष्क शहा व एकता शहा यांच्या मार्गदर्शनाने बारामती मध्ये असे पहिल्यांदाच काहीतरी वेगळे आयोजित करण्यात आले. कीप ऑन रोलीन स्केटिंग क्लबच्या मुलांच्या पालकांची टीम तसेच वॉलेंटियर्सची टीम यामुळे ही स्पर्धा विनाअडथळा सुंदर रितीने पार पडला. त्यानंतर अधिराज लॉन्स मध्ये यांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय